Home /News /maharashtra /

Aurangabad Crime: एकतर्फी प्रेमातून तरुणीची गळा चिरून हत्या, 24 तासांच्या आत आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Aurangabad Crime: एकतर्फी प्रेमातून तरुणीची गळा चिरून हत्या, 24 तासांच्या आत आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

200 फूट ओढत नेऊन तरुणीची गळा चिरून हत्या, आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

200 फूट ओढत नेऊन तरुणीची गळा चिरून हत्या, आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

औरंगाबाद, 22 मे : एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन मुलीची गळा चिरून हत्या (Jilted lover killed college girl) केल्याची घटना काल (21 मे) औरंगाबाद (Aurangabad)मध्ये झाली. आरोपीने पीडित तरुणीला 200 फूट दूरपर्यंत ओढत नेलं आणि त्यानंतर तिचा गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली. आरोपी तरुणीला ओढत नेत असल्याचं घटनास्थळावरील सीसीटीव्हीत कैद झालं होतं. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. औरंगाबाद पोलिसांनी आरोपी शरण सिंग याला ताब्यात घेतलं आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून पोलिसांनी आरोपी शरण सिंग याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी आपल्या बहिणीच्या घरी लपून बसला होता. औरंगाबाद शहरातील देवगिरी कॉलेज परिसरात ही घटना घडली. विद्यार्थिनीला कॉलेजपासून 200 फूट ओढत नेत तिची सुऱ्याने भोसकून हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र भर दिवसा कॉलेजमधील विद्यार्थिनीची अशा प्रकारे हत्या केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा सवाल उपस्थित केला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने कॉलेजमधील विद्यार्थिनीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मृतक विद्यार्थीनी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मृतक तरुणी ही बीबीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. काल (21 मे) दुपारच्या सुमारास या तरुणीला आरोपीने गाठले. त्यावेळी दोघांत वाद झाला. यानंतर आरोपीने त्या तरुणीला 200 फूट दूरपर्यंत ओढत नेले आणि नंतर आपल्याजवळील धारदार चाकू काढत तिचा गळा चिरला. महाविद्यालयीन तरुणीवर कारमध्ये बलात्कार महाविद्यालयीन तरुणीवर कारमध्ये आत्याचार करून मित्राच्या मदतीने व्हिडीओ बनवण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. इतकेच नाही तर बलात्काराचा हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. औरंगाबादमधील या घटनेने एकच खळबळ उडाली. महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्यावर आत्याचार करण्यात आला. इतकेच नाही तर तिला जिवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात येत होती. ही घटना रविवारी (15 मे) उघडकीस आली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Aurangabad, Crime, Murder

पुढील बातम्या