मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Aurangabad Child Marriage Case :आई, वडिलांच्या भांडणात अल्पवयीन मुलीचा बळी, जे होवू नये तेच केलं

Aurangabad Child Marriage Case :आई, वडिलांच्या भांडणात अल्पवयीन मुलीचा बळी, जे होवू नये तेच केलं

औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

अविनाश कानडजे(औरंगाबाद), 29 जानेवारी : औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये एक भयानक प्रकार समोर आला आहे. पती-पत्नीने स्वतंत्र संसार थाटल्यामुळे स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले आहे. याप्रकरणी बापासह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पती-पत्नीने स्वतंत्र संसार थाटल्यामुळे स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले. याप्रकरणी बापासह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पित्यासह 8 जणांविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीता ही 15 वर्षांची आहे. तिच्या आईवडिलांचे पटत नसल्यामुळे त्यांनी आपापले स्वतंत्र संसार थाटले. पण स्वताच्या अल्पवयीन मुलीचे हैद्राबातल्या आमिरखान हनिफखा याच्याशी जबरदस्ती लग्न लावून दिले. 

हे ही वाचा : अनैतिक संंबंधातून प्रेमीयुगुलाने उचललं टोकाचं पाऊल, बीडमधील घटनेने खळबळ

ही आपबिती त्या पिडीतेने भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांना सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या तक्रारीवरुन या प्रकरणी पिडीतेची आई वडिल, आजी, पती आमिर आणि इतर ४ जणांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरील कारवाई पोलिसउपायुक्त अपर्णा गिते यांच्यामार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे, पीएसआय अनिता फसाटे, पोलिस कर्मचारी कल्पना खरात व गिरीजा आंधळे यांनी पार पाडली.

वाळुज औद्योगिक नगरीतील कामगार चौकात टपरी थाटून व्यवसाय करणाऱ्या भारत माधवराव सरगर या व्यवसायिकाची अज्ञात टोळक्याने येऊन टपरीची मोडतोड केलीय घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पाहणी केली असून, टपरीची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवणाऱ्या आरोपीचा एमआयडीसी वाळूज पोलीस शोध घेत आहेत.

हे ही वाचा : Buldana Rape Case : नात्याला काळीमा, काकाने केला आपल्या 15 वर्षांच्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार

वाळूज औद्योगिक वसाहतीत धक्कादायक प्रकार

वाळूज औद्योगिक नगरीतील कामगार चौकात टपरी थाटून व्यवसाय करणाऱ्या भारत माधवराव सरगर या व्यवसायिकाची अज्ञात टोळक्याने येऊन टपरीची मोडतोड केली आहे. घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पाहणी केली असून, टपरीची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवणाऱ्या आरोपीचा एमआयडीसी वाळूज पोलीस शोध घेत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime, Crime news