मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सभेआधी इफ्तारला या', इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना निमंत्रण, पोलीस आयुक्तांसोबत नेमकी चर्चा काय?

'सभेआधी इफ्तारला या', इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना निमंत्रण, पोलीस आयुक्तांसोबत नेमकी चर्चा काय?

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं आहे.

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं आहे.

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं आहे.

  • Published by:  Chetan Patil

औरंगाबाद, 29 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची 1 मे महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्थेसाठी काही मदत लागली तर निश्चिंतपणे सांगा, असं आवाहन केलं. पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना सभेआधी इफ्तार पार्टीला येण्याचं निमंत्रण दिलं. तसेच भाजप, शिवसेना आणि मनसेच्या हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरुन टीका देखील केली.

"खरंतर हा हिंदू आणि मुसलमानचा मुद्दा नाहीय. तर हिंदुत्वची रक्षा सर्वात जास्त कोण करु शकतं, या मुद्द्यावरुन तीन पक्ष मैदानात उतरले आहेत. एकीकडे भाजप, दुसरीकडे शिवसेना आणि तिसरीकडे मनसे आहे. या तिघांमध्ये हिंदुत्वाच्या रक्षासाठी रस्सीखेच सुरु आहे. ते मैदानात उतरले आहेत तर त्यांना एक सॉफ्ट पंचिंग बॅट हवी आहे. ही सॉफ्ट पंचिग बॅट तिघांसाठी मुसलमान आहे. कारण कधी मशिदला तर कधी मुसलमानला टार्गेट करणार. पण आता लोकही हुशार झाले आहेत. त्यामुळे ते भडकणार नाहीत. नुकसाण होईल ते गरिबाचंच होणार आहे. याची जाणीव लोकांना आहे", अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली.

राज ठाकरेंना इफ्तारचं निमंत्रण

"राज ठाकरे येणार आहेत. त्यांची सभा होणार आहे. मी त्यांना एवढंच सांगेल की, 1 तारेखेची सभा सुरु होण्याआधी इफ्तार करण्यााठी आले, आपण हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजाच्या नागरिकांनी इफ्तार केलं तर चांगला संदेश जाईल. रमजान सणाचा मुसलमान अनेक दिवसांपासून वाट पाहतो. गेल्या तीन वर्षांपासून व्यावसायिकांचं नुकसान झालं आहे. ९९ टक्के नागरीक शांतीप्रिय आहेत. तर एक टक्के नागरिकांना गडबड, हंगामा हवा असतो. पोलीस त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात सक्षम आहेत. छोटे मोठे दुकानदार, व्यावसायिक यांना भीती आहे. पण मी त्यांना सांगतो. तसं काही होणार नाही. मी पोलिसांनाही आवाहन करतो की, इथल्या लोकप्रतिनिधींची मदत घ्या", असं जलील म्हणाले.

(पंजाबमध्ये शिवसेना अन् शीख संघटनेमधील संघर्षानंतर राज्य सरकार अलर्ट; घेतला मोठा निर्णय)

"मी खासदार म्हणून दिवाळीचा फराळ खाण्यासाठी जातो. त्यामुळे मी इफ्तार पार्टीचं निमंत्रण देतो. नमाज झाल्यानंतर सगळे येतात. पण तुम्ही लोक येत नाही. मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही देखील या", अशा शब्दांत जलील यांनी निमंत्रण दिलं.

"मी औरंगाबादचा खासदार म्हणून सांगतोय, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याबाबत मला एक टक्काही चिंता नाही. औरंगाबादच्या जनतेला सांगू इच्छितो मनात भीती असेल तर ती काढून टाका. राजकीय पक्षाचा एक नेता त्यांचा अजेंडा घेऊन भाषण देण्यासाठी येतोय. पण त्याला इतकं गांभीर्याने घेऊ नका की उद्या आपसात काही वाद होईल. दुकानदार आणि व्यावसायिकांना चिंता आहे. रमजानच्या शेवटचे दिवस महत्त्वाचे आहेत. कारण लोक शेवटच्या दिवसांमध्ये जास्त खरेदी करतात. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीती आहे. पण मी सांगू इच्छितो, तुम्ही निश्चिंत राहा. घाबरु नका. औरंगाबादच्या संस्कृतीला आपण पुढे नेत राहो. मी राज ठाकरेंना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, सभेला जाण्याआधी आपण भेटू. आपण दोघं शत्रू नाहीत. तुम्ही आमच्यासोबत इफ्तार पार्टीला या. मी पोलिसांना विश्वास द्यायला आलो होतो की, आपल्याला आमची काही गरज लागली तर आम्ही मदतीसाठी येऊ", असं जलील मनमोकळेपणाने म्हणाले.

First published: