Home /News /maharashtra /

Aurangabad Accident : शेतातून घरी जाणाऱ्या दोन महिलांना टेम्पोने उडवले, दोघींचाही जागीच चिरडून मृत्यू

Aurangabad Accident : शेतातून घरी जाणाऱ्या दोन महिलांना टेम्पोने उडवले, दोघींचाही जागीच चिरडून मृत्यू

शेतातून मोल मजुरी करुन घरी परतताना दोन महिलांना टेम्पोने उडवल्याची घटना वैजापूर तालुक्यातील मणुर येथे उघडकीस आली आहे. (Aurangabad Accident)

  औरंगाबाद, 06 ऑगस्ट : शेतातून मोल मजुरी करुन घरी परतताना दोन महिलांना टेम्पोने उडवल्याची घटना वैजापूर तालुक्यातील मणुर येथे उघडकीस आली आहे. (Aurangabad Accident)या अपघातामध्ये दोघींचाही चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. ठगनबाई विश्वनाथ दवंगे (वय 56), मंगल आसाराम दवंगे (वय 38) अशी या दोघी चुलती पुतनींची नावे आहेत. या दोघी शेतातून मोल मजुरी करुन घरी पायी परतत असताना साकेगाव कडुन मणुरकडे येणाऱ्या टेम्पोने जोराची धडक दिली. यामधे दोघी चुलती पुतनीचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चालकाने आपले वाहन जागेवर सोडुन पळ काढला. घटनास्थळी शिऊर पोलीस दाखल झाले आहेत.

  दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात

  नागपूर-औरंगाबाद महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिंगणापूर फाट्या जवळ दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. दरम्यान दोन्ही ट्रकचा अपघात इतका भीषण होता कि त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरील खड्डा वाचवताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातामूळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबल्याने लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सळई घेऊन जाणारा ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळल्याने सळई दोन जणांच्या अंगातून आरपार गेली.

  हे ही वाचा : Mental Stress Benefits : तुम्हाला माहितीये? मेंटल स्ट्रेसने केवळ नुकसानच नाही तर हे फायदेही होतात

  रस्ते वाहतूक वेगवान व्हावी म्हणून राज्यात महामार्गांचे जाळे उभारले जात आहे. प्रत्येक महामार्गांवर वाहनांचा वेग मर्यादित केला, तरीपण वाहनचालकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्यामुळे राज्यात दररोज रस्ते अपघातात सरासरी ४३ जणांचा मृत्यू होत असून जानेवारी ते जून या सहा महिन्यांत पावणेआठ हजार अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यात पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर या ११ जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा ठरला आहे.

  हे ही वाचा : गुजरात फॉर्म्युला की 2014 रिटर्न? मंत्रिमंडळाबाबत भाजपचं नेमकं काय ठरलं

  सिल्लोड तालुक्यात पती पत्नी ठार

  सिल्लोड तालुक्यातील डोईफोडा-पारोळा फाट्यावर भरधाव क्रूजरने एका मोटरसायकला धडक दिली. या धडकेत पती-पत्नी गाडीखाली चिरडले गेले. घटनेत पतीचा जागेवरच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र बुधवारी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीनेही अखेरचा श्वास घेतला.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Accident, Aurangabad, Aurangabad News, Major accident

  पुढील बातम्या