मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

PFI संघटनेचं कार्यालय फोडण्याचा मनसेसैनिकांचा प्रयत्न, औरंगाबादमध्ये राडा

PFI संघटनेचं कार्यालय फोडण्याचा मनसेसैनिकांचा प्रयत्न, औरंगाबादमध्ये राडा

औरंगाबादमध्ये किराडपुरा भागात मनसे सैनिकांनी PIF संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला

औरंगाबादमध्ये किराडपुरा भागात मनसे सैनिकांनी PIF संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला

औरंगाबादमध्ये किराडपुरा भागात मनसे सैनिकांनी PIF संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India
  • Published by:  sachin Salve

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 24 सप्टेंबर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर देशभरात कारवाई करण्यात आली आहे. अशातच पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेची निषेध करत औरंगाबादमध्ये मनसेनं PIF संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला.

पुण्यातील पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजीचे राजभरात पडसाद उमटताना दिसत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबादमध्ये किराडपुरा भागात मनसे सैनिकांनी PIF संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांचा पी.एफ.आय.कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पीएफआयच्या गडात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पण वेळीच पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी झेंडे, रंग, इत्यादी साहित्य ताब्यात घेतलं.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीएफआय आणि संबंधित आंदोलकांवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुकवर संबंधित व्हिडीओ शेअर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे घोषणाबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ही कीड समूळ नष्टच करा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. याशिवाय 'तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा' असा देखील उद्गार राज ठाकरे यांनी काढला आहे.

"ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली... थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत", असं ठाकरेंनी बजावलं.

First published: