सुशील राऊत, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 10 मार्च : छत्रपती संभाजीनगरला ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये पर्यटकांना भुरळ घालणारे एकापेक्षा एक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. यापैकीच एक म्हणजे अत्तर गल्ली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 100 वर्षांपासून अत्तर गल्ली प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वेगवेगळे सुगंधी अत्तर उपलब्ध आहेत. या ठिकाणी अत्तर खरेदी करण्यासाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून लोक येत असतात. चला तर मग जाणून घेऊया अत्तर शब्दाचा इतिहास आणि ओरिजनल अत्तर कसे ओळखावे याबाबत.
अत्तर शब्दाचा इतिहास
अत्तर हा शब्द पारशी भाषेतील इतिर या शब्दापासून आला आहे. इतिर याचा अर्थ सुगंधी द्रव्य असा होतो. पैगंबर मोहंमद यांना अत्तर खूप आवडत असे त्यामुळे त्यांचे अनुयायी लोक मोठया प्रमाणात अत्तर लावू लागले अन बघता बघता अत्तराला धार्मिक महत्त्व आले. इस्लाम धर्मात अत्तराला रुह की गिजा म्हणतात. याचा अर्थ होतो की सुगंध ही आत्म्याची भूक आहे. तसेच हिंदू धर्मामध्ये देखील पूजेसाठी अत्तरचा वापर केला जातो.
अत्तर गल्ली प्रसिद्ध
छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक भागामध्ये अत्तर गल्ली प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गेल्या 100 वर्षांपासून अत्तरची दुकाने आहेत. करिमुल्ला शेख यांनी 90 वर्षांपूर्वी सिटी चौक येथील अत्तर गल्लीत मोहम्मद अय्युब अँड सन्स हे दुकान सुरू केलं. तेव्हापासून हे दुकान सुरू आहे. या ठिकाणी येणारे अत्तर हे किन्नरोज येथून येत असतात. या दुकानामधून छत्रपती संभाजीनगर सोबतच मराठवाड्यातील लोक अत्तर घेऊन जात असतात. आता दुकान सांभाळणारी त्यांची पाचवी पिढी आहे, असं या दुकानचे मालक मोहम्मद इकबाल यांनी सांगितले.
ओरिजनल अत्तर कसा ओळखावा?
व्यवसायामध्ये काहीजण आता कमी कालावधीत जास्त पैसे कमावण्यासाठी ओरिजिनल अत्तरमध्ये तेल मिक्स करून त्याची कॉन्टिटी वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि ते विक्री केले जातात. त्याला भेसळयुक्त अत्तर असं म्हटलं जातं. ओरिजिनल अत्तर घ्यायचे असेल तर खरेदी करताना प्रसिद्ध व विश्वासू दुकानातूनच अत्तर खरेदी करावे. ओरिजनल अत्तर हा बारा तासापेक्षा जास्त काळ टिकून राहतो तर डुबलीकेट अत्तर हा एक दोन तासांमध्ये त्याचा सुगंध निघून जातो, असं मोहम्मद इकबाल यांनी सांगितले.
Mumbai Market : पर्स घेण्याचा विचार करताय? 'या' ठिकाणी आहेत भरपूर ऑप्शन, Video
कोणते प्रसिद्ध अत्तर मिळतात?
जन्नत उल फर्दोस, हिना, चंदन, गुलाब, मोगरा, केवडा, रेहान, तुलसी, कमाल, खास (वाडा), चमेली, सबाया, गुलिस्तान, अराबाब, मुष्ख रिझाली, कस्तुरी, शाही दरबार, मरजान, मरियम, उद उल् उजलाल कुल वॉटर, क्रिस्टल ब्लू, चॉईस, अक्व डिजिओ, ब्लॅक अक्सेस, एल.व्हाईट, सी.के. अनिमाल, उद फॉर ग्लोरी , प्रॉपर्टी, फोरेवर, क्रिड अवेंटस, फ्रेंच हे प्रसिद्ध अत्तर गल्लीमध्ये मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.