मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : सणासुदीच्या काळात भाडेवाढ; रिक्षात बसताच मोजावे लागणार 26 रूपये

Aurangabad : सणासुदीच्या काळात भाडेवाढ; रिक्षात बसताच मोजावे लागणार 26 रूपये

सणासुदीच्या काळामध्ये औरंगाबादकरांना भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे.

सणासुदीच्या काळामध्ये औरंगाबादकरांना भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे.

सणासुदीच्या काळामध्ये औरंगाबादकरांना भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे.

औरंगाबाद, 17 सप्टेंबर : पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली असल्यामुळे रिक्षा चालकांना पूर्वीच्या भाड्यामध्ये रिक्षा चालवणं परवडत नसल्यामुळे रिक्षा चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. औरंगाबाद शहरातील रिक्षाचालक संघटनेच्या दरवाढीच्या मागणीला जिल्हा प्रशासनाने नुकताच हिरवा कंदीलच दाखविला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये औरंगाबादकरांना भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या दीड किलोमिटर प्रवासासाठी प्रवाशाला आता तब्बल 26 रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या 2 ऑक्टोबरपासून ही नवीन भाडेवाढ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस महागाई वाढत असल्यामुळे रिक्षा चालकांनी रिक्षांच्या भाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. शहरामध्ये 40 हजारांहून अधिक रिक्षा आहेत. ज्यामध्ये 28 हजार रिक्षा दररोज रस्त्यांवर धावत असतात. दरम्यान यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या रिक्षाचालक संघटने सोबत तीन बैठका झाल्या. यावेळी रिक्षा चालक जोपर्यंत नियमांचे पालक करत नाहीत तोपर्यंत भाडेवाढ नाही असे त्यांना सांगितले होते. मात्र, रिक्षा संघटनेच्या केलेल्या मागणीनुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यात पहिल्या दीड किलोमिटरच्या प्रवासासाठी 26 रुपये तर त्यापुढे प्रत्येकी 18 रुपये किलोमिटर प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येणार आहे. यापूर्वी 1 किलोमिटर प्रवासासाठी 14 रुपये भाडे आकारणी करण्यात येत होती. नवीन प्रस्तापित भाडेवाढीत पहिला टप्पा दीड किलोमिटरचा ठेवण्यात आला आहे. हेही वाचा : मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा पहिला दिवस कसा होता? पाहा 74 वर्षांपूर्वीचा थरारक अनुभव Video सीटरलाही 30 टक्के भाडेवाढ मीटर रिक्षाप्रमाणेच सीटर रिक्षालाही भाडेवाढ देण्यात आली आहे. यात सीटरसाठी एकूण रिक्षाभाड्याच्या 30 टक्के भाडे आकारून तीन प्रवाशांना समान भाडे द्यावे लागेल. आता शेअरींग रिक्षासाठी नवीन भाडेवाढीनुसार अतिरिक्त 30 टक्के रक्कम प्रवाशांना मोजावी लागेल. तिघांच्या प्रवासासाठी 100 रुपये झाल्यास 130 रुपये तिघांना समान हिश्यांत द्यावे लागतील. रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करावे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षा चालक भाडेवाढ करण्यासंदर्भात मागणी करत होते. नवीन भाडेवाढ 2 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. मात्र रिक्षा चालकांनी देखील नियमांचे पालन करावे, असं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. हेही वाचा : Akola : पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, पाहा Video सरकारने नागरिकांचा विचार करावा गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल सोबत सर्वच वस्तूंच्या किंमती वाढवत आहेत. यामुळे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच आता रिक्षाची भाडेवाढ झाली असल्यामुळे सर्वसामान्यांना याचा आर्थिक भार पडणार आहे. सरकारने नागरिकांचा विचार करावा, अशी प्रतिकिया नागरिक राहुल सरोदे यांनी दिली आहे.
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News

पुढील बातम्या