Home /News /maharashtra /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका ऐकून MIMचे इम्तियाज जलील प्रभावित, बंडखोरांबद्दल म्हणाले....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका ऐकून MIMचे इम्तियाज जलील प्रभावित, बंडखोरांबद्दल म्हणाले....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या बंडखोर आमदारांना केलेलं आवाहन ऐकून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील प्रभावित झाले आहेत.

    औरंगाबाद, 22 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे (Shiv Sena) 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जातोय. हा दावा खरा ठरला तर महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेकडून शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिंदे यांची मनधरणी करण्याचा काल सकाळपासून प्रयत्न सुरु आहे. पण शिंदेंच्या समर्थक आमदारांची संख्या वाढत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार असल्याचं म्हटलं. त्यांच्या या भावनिक आवाहनानंतर एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतात ते येत्या काळात कळेलच पण ठाकरेंच्या या आवाहनाला ऐकून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) प्रभावित झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले? "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खरेपणाचं खरंच कौतुक. आमच्यात राजकीय मतभेद असू शकतात पण आज उद्धव ठाकरेंना ऐकल्यानंतर त्यांच्या बद्दलचा आदर आणखीन वाढला. तुमच्या विनम्रतेने तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक दिली आहे", असं जलील ट्विटरवर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना भावनिक साद दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. "माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. मी आजच वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर जाण्यास तयार आहे. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करत आहे. गायब आमदारांनी समोर येऊन माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे. कोरोना नसता तर मीच राजीनामा घेऊन गेलो असतो. शिवसैनिकांनी सांगावं मी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी योग्य नाही, मी शिवसेना प्रमुखपद सोडण्यास तयार आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या