मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुख म्हटल्यानंतर आता संजय सिरसाटांचा यू-टर्न, त्या ट्वीटबद्दल म्हणाले...

उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुख म्हटल्यानंतर आता संजय सिरसाटांचा यू-टर्न, त्या ट्वीटबद्दल म्हणाले...


मोबाईलमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाला झाला होता. त्यामुळे मागची पोस्ट आता फॉरवर्ड झाली आहे.

मोबाईलमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाला झाला होता. त्यामुळे मागची पोस्ट आता फॉरवर्ड झाली आहे.

मोबाईलमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाला झाला होता. त्यामुळे मागची पोस्ट आता फॉरवर्ड झाली आहे.

  • Published by:  sachin Salve
औरंगाबाद, 13 ऑगस्ट : शिंदे सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. पण, शिंदे गटातील अनेक इच्छुकांना संधी न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज आहे. आमदार संजय शिरसाट यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल ट्वीट केलं आहे. पण, आता शिरसाट (sanjay shirsath) यांनी यू-टर्न घेतला आहे. शिवसेनेत बंडखोरी करून संजय शिरसाट हे शिंदे गटामध्ये सामील झाले. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संजय सिरसाट यांना संधी मिळेल अशी शक्यता होती पण शिरसाट यांनी संधी मिळाली नाही. त्यामुळे शिरसाट हे कमालीचे नाराज झाले होते. कालच त्यांनी ट्वीट करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्वीट केलं होतं. शिवसेनेवर टीका करणारे संजय शिरसाट अचानक शिवसेनेचं कौतुक करू लागल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण, 24 तासांमध्ये शिरसाट यांनी यू-टर्न घेतला आहे. मोबाईलमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाला झाला होता. त्यामुळे मागची पोस्ट आता फॉरवर्ड झाली आहे. यात तांत्रिक चूक झाली आहे. मी दबाबव तंत्र वापरत नाही. मी उद्धव ठाकरे बद्दल आदर भाव बाळगून आहे, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली. शिरसाट यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं? संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेतील एका भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला होता. यामध्ये उद्धव ठाकरे यांना कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख केला होता. अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषण करत असताना, आम्ही दिलेलं वचन पाळतोच आणि दिलेला शब्द खरा करून दाखवतो, असं म्हणाले होते. या व्हिडीओमुळे शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शब्दाची आठवण करून दिल्याची चर्चा रंगली होती. पण शिरसाट यांनी लगेच ट्वीट डिलीट केलं होतं.
First published:

पुढील बातम्या