मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : पंतग उडवणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज, 'त्या' विक्रेत्यांवर करणार कारवाई

Aurangabad : पंतग उडवणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज, 'त्या' विक्रेत्यांवर करणार कारवाई

औरंगाबाद शहरामध्ये नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या वरती कारवाई करून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद शहरामध्ये नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या वरती कारवाई करून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद शहरामध्ये नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या वरती कारवाई करून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 17 नोव्हेंबर : औरंगाबाद शहरामध्ये नायलॉन मांजाच्या विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, बंदी असली तरीही मानवी जीवितास, पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाची बाजारपेठेत सर्रास विक्री होत आहे. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर शहरातील दोन विक्रेत्यांच्या दुकानात छापा टाकत 22 हजारांचा मांजा जप्त करत नुकतेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जानेवारी महिन्यातील संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच पतंग उडवण्याचे तरुण वर्गात वेध लागले आहे. यात प्लास्टिक, सिंथेटिकपासून बनवलेल्या काचेचा थर असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतो. त्यातून अनेकांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गेल्यावर्षी नायलॉन मांजा विक्री झाल्यामुळे अनेक दुचाकी स्वरांचे गळे कापले गेले. यामध्ये तीन ते चार महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. या सोबतच नायलॉन मांजामुळे पक्षी मृत्यू मुखी पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या.

Aurangabad : शिक्षण विभागाच्या सूचनेला केराची टोपली, 2906 शाळांची सुरक्षा 'राम भरोसे'

मानवी जीवितास, पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका असलेल्या नायलॉन मांजा वरती विक्री करण्यास बंदी आहे. असं असताना कोणी जर विक्री करत असेल त्यांच्यावर ती कारवाई करून  थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अशा सूचना सर्व पोलीस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. यामुळे कोणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये, असं पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितलं आहे.

दोघांवर गुन्हे दाखल

नायलॉन मांजा शहरात विक्री करण्यास बंदी असताना सिटी चौक भागामध्ये शेख तोफिक शेख लतीफ (वय 31 रा.हर्ष नगर) याच्याकडे 53 मांजाचे नग आढळून आले आहेत. तर जुना बाजार भागामध्ये जितेंद्र चंपालाल पुढील (वय 52) याच्याकडे 11 नग आढळून आले आहेत. यामुळे यांच्याकडील मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिवाळ्यात खा आमरस, औरंगाबादमध्ये नोव्हेंबर महिन्यात मिळतोय आंबा! Video

थोड्याशा आनंदासाठी पक्षांच्या जिविताशी खेळू नये

आपली संस्कृती परंपरा जपण्यासाठी आपण दिवाळी, मकर संक्रांत, होळी इत्यादी सण साजरी करत असतो. मात्र, यामुळे निसर्गाचा देखील समतोल राखणे आपली जबाबदारी आहे. वृक्षांची संख्या घटल्यामुळे पक्षांची संख्या देखील घटली आहे. यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतके शिल्लक असलेले पक्षी नायलॉन मांजामुळे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे आपल्या थोड्याशा आनंदासाठी पक्षांच्या जीवित अशी खेळू नये. नायलॉन व्यतिरिक्त इतर मांजा देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करून पतंग उडवून आपण आपला आनंद साजरा करावा, असं आवाहन पक्षीमित्र डॉ. दिलीप यारदी यांनी केलं आहे.

First published:

Tags: Aurangabad News, Local18