मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Aurangabad: वाद मिटवायला गेलेल्या पोलिसाचा दोरीनं आवळला गळा; थरारक घटनेचा LIVE VIDEO

Aurangabad: वाद मिटवायला गेलेल्या पोलिसाचा दोरीनं आवळला गळा; थरारक घटनेचा LIVE VIDEO

Crime in Aurangabad: औरंगाबादेत एक संतापजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी वाद सोडवण्यासाठी (Went to settle dispute) गेलेल्या एका पोलिसाचा दोन तरुणांनी चक्क दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

औरंगाबाद, 15 डिसेंबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील लासूर स्टेशन गावात एक संतापजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी वाद सोडवण्यासाठी (Went to settle dispute) गेलेल्या पोलिसाचा दोन तरुणांनी चक्क दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न (Attempt to murder) केला आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीन संबंधित घटना आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दीपक वाघचौरे आणि मारुती वाघचौरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणांची नावं आहे. घटनेच्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशन गावातील बस स्थानक परिसरात काही तरुणांमध्ये वाद सुरू होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस कृष्णा पवार हे आरोपींमधील वाद मिटवण्यासाठी  घटनास्थळी गेले होते. ते आरोपींशी बातचित करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होते.

हेही वाचा-डोळ्यात मिरची पूड टाकत लोखंडी रॉडने घातले घाव; अनैतिक संबंधातून BF चा खेळ खल्लास

यावेळी एका आरोपीनं बेसावध असलेले पोलीस कर्मचारी कृष्णा पवार यांच्या पाठीमागून दोरी टाकून त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार भररस्त्यावर घडला आहे. ही घटना घडत असताना आसपास काही नागरिक देखील होते. यातील एका नागरिकांनी संबंधित घटना आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली आहे. आरोपी तरुणी पोलीस कर्मचारी कृष्णा पवार यांच्या पाठीमागून दोरी टाकत असताना स्पष्टपणे दिसत आहे.

या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी दीपक वाघचौरे आणि मारुती वाघचौरे या दोन आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Aurangabad, Crime news