मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sugar Factory : मराठवाड्यात अद्यापही 50 टक्के साखर कारखाने सुरू, ऊस वाळत चालल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

Sugar Factory : मराठवाड्यात अद्यापही 50 टक्के साखर कारखाने सुरू, ऊस वाळत चालल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद (Marathwada, Solapur, Osmanabad) यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत.

मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद (Marathwada, Solapur, Osmanabad) यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत.

मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद (Marathwada, Solapur, Osmanabad) यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत.

औरंगाबाद, 26 मे : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. (Sugarcane Farmer) दरम्यान ऊस तोडणीवरून राज्यात रोज वेगवेगळ्या नव्या घटना घडत आहेत. मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद (Marathwada, Solapur, Osmanabad) यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील 60 कारखान्यांपैकी 28 कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम आटोपला आहे. 23 मेपर्यंत सर्व कारखान्यांनी 3 कोटी 17 लाख 10 हजार 176 टन उसाचे गाळप करत 3 कोटी 16 लाख 97 हजार 990 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. 32 कारखान्यांचे गाळप अजूनही सुरूच आहे.

राज्यात मागच्या कित्येक वर्षांच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात वाढ होणार आहे. परंतु अद्यापही राज्यातील साखर कारखाने सुरू असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. साखर कारखाने जवळ असुनही उसाला तोड येत नाही तर भारनियमनामुळे काही शेतकऱ्यांचे उसाचे पीक शेतातच वाळत असल्याचे चित्र आहे. 

हे ही वाचा : Vidarbha rain update : विदर्भात हवामान खात्याकडून yellow alert, या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा

दरम्यान राज्यात अद्यापही अद्याप 16 लाख टनापेक्षा जास्त ऊस शिल्लक आहे. हा ऊस कारखान्याला तुटून जाण्यासाठी जून महिन्यातील दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी  याबाबत माहिती दिली. राज्यात अजूनही बीड, उस्मानाबाद, यासह 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले.

विभागनिहाय साखर गाळप आणि उतारा

उस्मानाबादमधील कारखान्यांनी 70 लाख 21 हजार 949 टन उसाचे गाळप करत सरासरी 9.60 टक्के साखर उताऱ्याने 67 लाख 39 हजार 864 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी 28 लाख 28 हजार 733 टन गाळप करत सरासरी 10.45 टक्के साखर उताऱ्यांने 29 लाख 53 हजार 716 क्विंटल साखर उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील कारखान्यांनी 27 लाख 47 हजार 446 टन गाळप करत 29 लाख 1 हजार 400 क्विंटल साखर उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 10.58 टक्के राहिला.

हे ही वाचा : या रेस्टॉरंटमध्ये पोटभर जेवण करा आणि मिळवा 1 लाख रुपये; फक्त पूर्ण करावी लागेल एक अट

बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी 45 लाख 99 हजार गाळप केले तर परभणी जिल्ह्यातील कारखान्यांनी 40 लाख 14 हजार 15 टन गाळप करताना सरासरी 10.35 टक्के साखर उताऱ्याने 41 लाख 52 हजार 700 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील कारखान्यांनी 21 लाख 42 हजार 228 टन उसाचे गाळप करत सरासरी 10.55 टक्के साखर उताऱ्याने 22 लाख 60 हजार 670 क्विंटल साखर उत्पादन केले. नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांनी 25 लाख 30 हजार 282 टन उसाचे गाळप करत 24 लाख 76 हजार 810 क्विंटल साखर उत्पादन केले.

साताऱ्यातील शेतकऱ्यांने दिला ऊस पेटवून

साताऱ्यात कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांनी स्वतःचा तीन एकरातील ऊस पेटवून दिला. राज्यकर्त्यांमुळे ऊस पेटवून देण्याची वेळ आली असल्याचा आरोप करत दोन्ही साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी ऊस तोडण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांनी ऊसाला पालापाचोळा जास्त असल्याचे कारण देत ऊस तोडण्यासाठी नकार दिल्याने त्यांना शाल श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचाही त्यांनी सत्कार केला.

गेली 20 महिने ऊसाचे पीक शेतात उभे आहे. अद्याप गाळप न झाल्याने ऊसाच्या वजनात मोठी घट झाली आहे. ऊस तोडीचे योग्य नियोजन नसल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. दरम्यान बर्गे यांनी राज्य सरकारचा निषेध करत तीन एकर क्षेत्रातील ऊस पेटवून दिला.

First published:
top videos

    Tags: Sugar facrtory, Sugarcane, Sugarcane farmer