मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : अब्दुल्ला मिया बाबाच्या उरूसाला थाटात सुरूवात, पाहा यंदा काय आहे खास? Video

Aurangabad : अब्दुल्ला मिया बाबाच्या उरूसाला थाटात सुरूवात, पाहा यंदा काय आहे खास? Video

औरंगाबाद तालुक्यातील शेकटा गावातील अब्दुल्ला मिया बाबा यांच्या उरुसाला सुरुवात झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 24 नोव्हेंबर : सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील शेकटा गावातील अब्दुल्ला मिया बाबा यांच्या उरुसाला सुरुवात झाली आहे. सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या या उरुसामध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. उरुसानिमित्त या ठिकाणी खेळण्याचे साहित्य, खाद्यपदार्थ इत्यादींची दुकाने थाटले आहेत.

औरंगाबाद पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शेकटा गावामध्ये गेल्या सव्वाशे वर्षापासून उरूस भरवला जातो. या उरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिंदू - मुस्लिम धर्मीय नागरिक आणि गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष हा उरूस निर्बंध असल्यामुळे भरवण्यात आला नव्हता. मात्र, आता दोन वर्षानंतर कोरोना संसर्गजन्य आजाराची लाट ओसरल्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये व निर्बंध मुक्त वातावरणात हा उरूस भरवला गेला आहे. यामुळे भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

Video: मुंबईनंतर औरंगाबादमध्ये गोवरचा शिरकाव, मुलांचं प्रमाण मोठं असल्यानं पालकांना टेन्शन!

अशी आहे आख्यायिका

1939 मध्ये अब्दुल्ला मिया बाबा हे शेकटा येथे आले होते ते आल्यानंतर सहा वर्ष त्यांचे या गावामध्ये वास्तव्य होतं. अब्दुल्ला मिया बाबा या ठिकाणी राहत असताना परिसरामध्ये राहणारे नागरिक मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असतं. दरम्यान 1945 मध्ये त्यांचं निधन झालं. अब्दुल्ला मिया बाबा यांच्या मृत्यूनंतर शेवपेटी जागेवरून हलवता आलेली नाही. म्हणून गावकऱ्यांनी त्याच ठिकाणी अब्दुल्ला मिया बाबाची कबर बनवली आहे आणि तेव्हापासून शेकटा येथील अब्दुल्ला मिया बाबाची दर्गा प्रसिद्ध आहे, असं दर्गा सेवेकरी सय्यद इलियाज यांनी सांगितले.

खाद्यपदार्थ व खेळाचे दुकाने थाटली

उरुसानिमित्त गावामध्ये खाजा या खाद्यपदार्थांची दुकाने थाटले आहेत. त्यासोबतच विविध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी खेळण्याची दुकानही मोठ्या प्रमाणात आहेत.

NDA Entrance : औरंगाबादच्या स्टेशनरी दुकानदाराची मुलगी देशात दुसरी! पाहा Video

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कोरोनाच्या दोन वर्षानंतर उरूस भरवला जाणार असल्यामुळे यंदा गावामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होईल ही गोष्ट लक्षात घेऊन औरंगाबाद पोलिसांनी कडे कोट बंदोबस्त लावलेला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांवरती लक्ष ठेवण्यात येते. त्यासोबतच चोरीचे प्रकार होऊ नये यासाठी सूचनाही केल्या जात आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Local18