मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्वातंत्र्य दिनी औरंगाबादमध्ये संतापजनक घटना उजेडात, अल्पवयीन मुलीवर 6 जणांकडून अत्याचार

स्वातंत्र्य दिनी औरंगाबादमध्ये संतापजनक घटना उजेडात, अल्पवयीन मुलीवर 6 जणांकडून अत्याचार

 काही आरोपींकडून यापूर्वीसुद्धा पीडित मुलीची छेड काढून तिच्यावर अत्याचार केला होता.

काही आरोपींकडून यापूर्वीसुद्धा पीडित मुलीची छेड काढून तिच्यावर अत्याचार केला होता.

काही आरोपींकडून यापूर्वीसुद्धा पीडित मुलीची छेड काढून तिच्यावर अत्याचार केला होता.

  • Published by:  sachin Salve
अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 15 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. पण औरंगाबादमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यातील कन्नड (kannad) तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका गावात अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. कन्नड ग्रामीण पोलिसांनी या सहाही आरोपींना ताब्यात घेतले असून, यात एका विधीसंघर्ष बालकाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका गावात ही घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर सहा नराधमांनी अत्याचार केला. विशेष म्हणजे, यातील काही आरोपींकडून यापूर्वीसुद्धा पीडित मुलीची छेड काढून तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. परंतु घरची परिस्थिती नाजूक आणि प्रतिकूल असल्यामुळे मुलीने घरी सांगितले नाही. त्यामुळे या नराधमांनी या पीडितेच्या असाह्यतेचा फायदा घेत नराधम तिला धमक्या देत होते. त्यामुळे या पीडितेची हिंमत झाली नाही. मात्र सहा नराधमांनी अत्याचार केल्यामुळे वेदना असह्य झाल्या आणि त्यानंतर या मुलीने ही संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. आपल्या लेकीसोबत घडलेल्या घटनेमुळे आईला तर धक्का बसला. तिने क्षणाचाही विलंब न करता कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि मुलीसोबत झालेली हकीकत सांगितली आणि या सहा नराधमांविरोधात तक्रार दिली. पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तातडीन सूत्र फिरवली आणि सहा आरोपींना कन्नड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. (VIDEO : खरं प्रेम कधीच संपत नसतं, या आजोबांनी पुन्हा खरं करून दाखवलं) आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये किरण साहेबराव गोंडे ( वय 32 वर्षे) व अरुण कैलास दरेकर (वय 31 वर्षे) या दोघांनी तिच्यावर जबरी बलात्कार केला. तसंच यापूर्वीही आरोपी किरण आणि अरुण याच्यासह श्रीकांत अशोक जाधव ( वय 33 वर्षे), गोविंद नेमीनाथ शेळके (वय 29 वर्षे), संकेत जगन जाधव (वय 19 वर्षे) आणि एका विधिसंघर्ष बालकानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेने औरंगाबाद जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
First published:

पुढील बातम्या