मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : इथे मिळेल गरबा आणि दांडियाचं मोफत प्रशिक्षण; औरंगाबादकरांनो लगेच घ्या प्रवेश

Aurangabad : इथे मिळेल गरबा आणि दांडियाचं मोफत प्रशिक्षण; औरंगाबादकरांनो लगेच घ्या प्रवेश

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

औरंगाबाद शहरातील क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे आज पासून 26 सप्टेंबर पर्यंत मोफत गरबा आणि दांडिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद, 22 सप्टेंबर : नवरात्र काही दिवसांवर आली आहे. नवरात्र म्हंटले की सर्वांच्या समोर येतो गरबा आणि दांडिया. नवरात्रात गरबा नाही खेळला तर नवरात्रीची धम्माल पूर्ण होत नाही. मात्र गरबा आणि दांडियाचे शास्त्रसुद्ध प्रशिक्षण नसेल तर हे पारंपरिक नृत्य काही फुलत नाही. यासाठीच औरंगाबाद शहरातील क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे आज पासून 26 सप्टेंबर पर्यंत मोफत गरबा आणि दांडिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र मध्ये नऊ दिवस गरबा आणि दांडिया खेळण्याला विशेष महत्त्व असतं. नऊ दिवसात देवीची पूजा केली जाते. तर प्रत्येक घरामध्ये आनंदाच उत्साहाचं वातावरण असतं. तसेच नवरात्रमध्ये गरबा आणि दांडिया खेळला जातो. मात्र, अनेकांना गरबा आणि दांडिया खेळण्याची इच्छा असताना देखील त्यांना खेळता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन औरंगाबाद शहरातील क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे गरबा आणि दांडिया खेळणाऱ्या भाविकांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे लहान मुलं व महिलांसाठी मोफत गरबा आणि दांडिया प्रशिक्षण दिले जाणार आहे. हेही वाचा : Navratri 2022 Information : नवरात्रीत अशी करा घटस्थापना, येथे पाहा पूजा विधी आणि शुभ मुहूर्त या प्रशिक्षण शिबिरात गरबा आणि दांडिया खेळणारे एक्सपर्ट प्रशिक्षण देणार आहेत. यात पाचिया, झगडी,धमाल इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य व दांडिया शिकवण्यात येणार आहे. सांयकाळी 5 ते 7 वाजेच्या दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर भरवण्यात येणार आहे. नवरात्र उत्सव महाराष्ट्रमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये गरबा आणि दांडियाला विशेष महत्त्व असतं. मात्र ज्यांना गरबा आणि दांडिया खेळण्याची इच्छा असूनही खेळता येत नाही. हीच  गोष्ट लक्षात घेऊन आम्ही मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा महिला व मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही करत आहोत असं क्रियेटीव्ह ग्रुप प्रमुख रवी जैस्वाल यांनी सांगितले आहे.   हेही वाचा : नशिबाची साथ हवी असेल तर ही कामे न चुकता करा, अनेक अडचणी होतील आपोआप दूर

गुगल मॅप वरून साभार

असा करा संपर्क बेस्ट प्राईसच्य बाजूला पैठण रोड औरंगाबाद येथे प्रशिक्षण मिळणार आहे. ज्यांना या प्रशिक्षण शिबिरामध्ये लाभ घ्यायचा असेल त्यांनी ई-मेल Ravi.jaiswal 321@gmail.com आयडी व 98230 85956 मोबाईल क्रमांकावर ती संपर्क साधावा. नोंदणी नंतर तुम्हाला या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेता येणार आहे.
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Navratri

पुढील बातम्या