Home /News /maharashtra /

'ती' इच्छा पूर्ण करण्यासाठी अध्यात्माची गोडी असलेल्या वृद्धेने एकादशीला उचललं टोकाचं पाऊल

'ती' इच्छा पूर्ण करण्यासाठी अध्यात्माची गोडी असलेल्या वृद्धेने एकादशीला उचललं टोकाचं पाऊल

औरंगाबाद शहरात अध्यात्माची गोडी असलेल्या वृद्धेने आजाराला कंटाळून एकादशीच्या दिवशी जीवनयात्रा संपवली आहे.

  अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 26 जुलै : आजारपण वाईटच, त्यातही जर हे आजारपण म्हातारपणात आलं तर आणखी वाईट अवस्था होती. प्रत्येकाला आजारपण सहन होईलच असं नाही. अशाच एक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. अध्यात्माची गोडी असलेल्या वृद्धेने आजाराला कंटाळून एकादशीच्या दिवशी अंगाला गावरान तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर परिसरात रविवारी रात्री उशिरा घडली. कावेरी भास्कर भोसले (वय 80)असे या वृद्धेचे नाव आहे. या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुटुंबीयांकडे बोलून दाखवली होती इच्छा रविवारी एकादशीच्या दिवशी दिवसभर भजन, हरिपाठ केल्यानंतर रात्री झोपायला गेल्यानंतर आपल्या रुममध्ये त्यांनी अंगाला गावरान तूप लावून देवाचे नाव घेत स्वत:ला पेटवून घेतले. त्यांना त्यांच्या मुलांने व सुनेने घाटी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी भोसले यांना अध्यात्माची प्रचंड आवड होती. तसेच एकादशीला मृत्यू यावा, अशी त्यांची भावना होती. याबाबत त्यांनी अनेकदा कुटुंबातील सदस्यांना बोलून दाखवली होती.

  मंदिरासमोर झोपलेल्या नागरिकांना गाडीने चिरडलं, एकाचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

  अंगाला सुती कापड बांधून लावलं तूप दरम्यान रविवारी कामिका एकादशी होती. त्यामुळे कावेरी भोसले यांनी रात्री 10 वाजेच्या सुमारास हरिपाठ म्हटला. कुटुंबातील सदस्य झोपण्यासाठी गेले असता, त्या स्वतः वरच्या मजल्यावर गेल्या.  वरच्या मजल्यावर गेल्यावर कावेरी यांनी बाथरूममध्ये जाऊन आधी सुती कापड हाताला गुंडाळले. त्यावर गावरान तूप ओतले. काही तूप अंगालाही लावले. त्यांनतर काडी ओढून त्यांनी स्वतः पेटवून घेतले. तूप टाकलेले असल्याने कापडाने लगेचच पेट घेतला. ज्यात कावेरी भोसले यांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे. याविषयी आम्ही कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची काहीही बोलण्याची मनस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Aurangabad, Aurangabad News

  पुढील बातम्या