Home /News /maharashtra /

Aurangabad : 76 वर्षांच्या आजोबांची जिद्द; चालण्याची स्पर्धा जिंकून केलं सर्वांना थक्क, VIDEO

Aurangabad : 76 वर्षांच्या आजोबांची जिद्द; चालण्याची स्पर्धा जिंकून केलं सर्वांना थक्क, VIDEO

title=

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व संस्थेच्या वर्धापन निमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धेचे ( walking competition ) आयोजन एसबीएच रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं होतं.

  औरंगाबाद, 06 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व संस्थेच्या वर्धापन निमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धेचे ( walking competition ) आयोजन एसबीएच रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये 80 सभासदांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये 76 वर्षांचे पद्माकर कुलकर्णी या आजोबांनी बाजीमारत स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवला. यामुळे शाळेत ज्याप्रमाणे मुलाला जिंकल्यानंतर आनंद होतो. त्याचप्रमाणे आनंद या आजोबांना देखील झाला आहे. या स्पर्धेसाठी पुरुषांच्या बरोबरीने महिला वर्गाचा व 83 वर्षांच्या आजोबांचा सहभाग लक्षवेधी ठरला. एसबीएच रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिष्ठानने ही स्पर्धा घेतली. या स्पर्धेचे नुकतेच अमरप्रीत चौकात आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेमध्ये निवृत्त 80 ज्येष्ठांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेसाठी संस्थाध्यक्ष प्रल्हाद बडवे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. प्रत्येक सहभागी स्पर्धकांनी 3 किलोमीटरचे अंतर पार केले.

  हेही वाचा : Aurangabad : News18 Local च्या बातमीचा दणका; BAMU मधील बंद कँटीन सुरु, पाहा VIDEO

  यात 76 वर्षांचे पद्माकर कुलकर्णी, 68 वर्षांचे मनोहर वाकपंजर, 63 वर्षांचे अजय कोटणीस, 73 वर्षांचे काशीनाथ खरात, 62 वर्षांचे अभयसिंग पवार, अतुल कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांकासाठी 75 वर्षांचे मोहंमद सिरजोद्दीन, 74 वर्षांचे प्रेमचंद तुल्ले, 66 वर्षांचे श्यामसुंदर मेढेकर, 64 वर्षांचे प्रमोद तोरवी होते. महिला गटात 55 वर्षांच्या स्नेहल आष्टूरकर यांनी या प्रथम आल्या तर महिला गटात 59 वर्षांच्या मोहिनी कुलकर्णी यांनी दुसरा क्रमांक पटकवला.  या स्पर्धेत विजय झाल्याचा जो आनंद आहे तो कशातच मोजून दाखवू शकत नाही  लहान मुलांना ज्या पद्धतीने स्पर्धेमध्ये विजय झाल्याचा आनंद होतो. त्याच पद्धतीचा आनंद मला देखील झाला. या स्पर्धेत विजय झाल्याचा जो आनंद आहे तो तुम्ही कशातच मोजून दाखवू शकत नाही अशी प्रतिकिया प्रेमचंद तुल्ले local18 बोलताना दिली. लहानपणापासून शाळेमध्ये किंवा स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आला नाही.  मात्र, या वयामध्ये पहिला क्रमांक आला आणि याचा जो आनंद आहे तो खूपच वेगळा आहे घरातील सदस्य व ओळखीच्या लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, अशी प्रतिकिया स्नेहल आष्टूरकर local18 बोलताना दिली. हेही वाचा : Pune : महागाईत खिशाचा विचार करणारं पुण्यातलं ठिकाण! इथं नाश्ताच्या खर्चात मिळतात कपडे, VIDEO दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सभासदांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये विजेत्या ज्येष्ठ नागरिक स्पर्धकांना 15 ऑगस्ट रोजी बक्षीस वितरण करण्यात येईल. हे बक्षीस देखील ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने असेल त्यांना उपयोगी पडेल किंवा त्यांच्यासाठी गरजेचे असणारे बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे. यासाठी बी. एम. कुलकर्णी, मंगेश देशपांडे, देगलूरकर, विनायक अभ्यंकर, प्रमोद बेंडे यांनी परिश्रम घेतले.
  First published:

  Tags: Aurangabad News

  पुढील बातम्या