मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

2 वर्षीय चिमुकलीला कपाटात कोंडून दिल्या नरक यातना; औरंगाबादेतील संतापजनक घटना

2 वर्षीय चिमुकलीला कपाटात कोंडून दिल्या नरक यातना; औरंगाबादेतील संतापजनक घटना

Crime in Aurangabad: औरंगाबाद शहरातील दलालवाडी येथे अमानुष घटना समोर आली आहे. येथील एका 40 वर्षीय तरुणानं एका 2 वर्षीय चिमुकलीला नरक यातना दिल्या आहेत.

Crime in Aurangabad: औरंगाबाद शहरातील दलालवाडी येथे अमानुष घटना समोर आली आहे. येथील एका 40 वर्षीय तरुणानं एका 2 वर्षीय चिमुकलीला नरक यातना दिल्या आहेत.

Crime in Aurangabad: औरंगाबाद शहरातील दलालवाडी येथे अमानुष घटना समोर आली आहे. येथील एका 40 वर्षीय तरुणानं एका 2 वर्षीय चिमुकलीला नरक यातना दिल्या आहेत.

  • Published by:  News18 Desk

औरंगाबाद, 28 नोव्हेंबर: औरंगाबाद (Aurangabad) शहरातील दलालवाडी येथे अमानुष घटना समोर आली आहे. येथील एका 40 वर्षीय तरुणानं एका 2 वर्षीय चिमुकलीला नरक यातना दिल्या आहेत. आरोपीनं पीडित मुलीला बेदम मारहाण करून तिला घरातील एका लाकडी कपाटात कोंडून (Minor girl beaten up and locked in cupboard) ठेवलं आहे. पीडित मुलीचा घरातून रडण्याचा आवाज आल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या धक्कादायक प्रकार उघडकीस येताच, परिसरातील लोकांनी विकृताला बेदम चोप दिला आहे.

या प्रकरणी नातेवाईकांनी क्रांती  चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. आरोपीनं 2 वर्षीय चिमुकलीला का मारलं आणि तिच्यावर अत्याचार झाले का? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास क्रांती चौक पोलीस करत आहेत. 2 वर्षीय मुलीला अमानुष मारहाण करत तिला लाकडी कपाटात कोंडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

हेही वाचा-पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; आधी कारमध्ये बसवलं मग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दलालवाडी भागातील रहिवासी असणारी 2 वर्षीय पीडित मुलगी घरातून अचानक गायब झाली होती. आपली मुलगी गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर, पीडितेच्या कुटुंबीयासह परिसरातील लोकांनी पीडितेला सर्वत्र शोधलं. पण तिचा काही थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, याच भागात राहणाऱ्या 40 वर्षीय विकृताच्या घरातून पीडित मुलीचा रडण्याचा आवाज आला. यावेळी नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश एका असता, एका लाकडी कपाटात चिमुरडी आढळली आहे. तिच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खूणा होत्या. तसेच तिच्या नाकातून रक्त देखील येत होतं.

हेही वाचा-मुंबईत 20 वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद कृत्य; टेरेसवर भयावह अवस्थेत आढळली पीडित

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, कुटुंबीयांनी घरमालकाच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला असता, तो निराला बाजार याठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेल्याचं समोर आलं. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन आरोपीला बेदम चोप दिला आहे. आरोपीनं पीडित मुलीला का कोडलं? तिच्यावर अत्याचार झाला का? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. आरोपी तरुण हा हॉटेल कामगार असून त्याने यापूर्वी देखील एका मुलीला पैसे मोजण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतलं होतं. यावेळी तो अर्धनग्नावस्थेत होता. आरोपीला अटक केली असून पुढील तपास क्रांती चौक पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Crime news