अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर : षष्ठी निमित्ताने देवदर्शनासाठी गेल्या 4 तरुणावर काळाने घाला घातला आहे. नदीत अंघोळीसाठी गेलेल्या चारही मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या पैकी दोन जणांचा मृत्यू सापडला असून इतरांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कायगाव टोका येथील नदीपात्रात ही घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील हे चारही तरुण गेले होते देवदर्शनासाठी गेले होते. षष्ठी निमित्ताने नेहमी देवदर्शनासाठी जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे वैजापूर इथं राहणारे चारही मित्र कायगाव टोका इथं गेले होते. नदीपात्रात अंघोळ करून देवदर्शनासाठी जावे लागते. त्यामुळे चारही तरुण नदीत उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत दोघेजण सापडले असून दोन जणांचा शोध सुरू आहे.
('या' मंदिरात 83 वर्षांपासून साजरी होते नाथषष्ठी, 'काला प्रसाद' वाटपाची आहे परंपरा, Video)
बाबासाहेब अशोक गोरे आणि शंकर पारसनाथ घोडके यांचे मृतदेह सापडले आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी कायगाव टोकाकडे धाव घेतली आहे.
(शेतकऱ्यांचं मरण स्वस्त होतंय का? कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात चार दिवसांत चार जणांनी संपवलं आयुष्य)
वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील पाचजण मोटरसायकलवर मढी येथे यात्रेसाठी चाललेले होते. जाताना हे सर्वजण प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ अंघोळीसाठी थांबले होते. गोदावरी नदीतील खड्यांचा अंदाज न आल्याने चारजण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी धावून आले. पोलीसही घटनास्थळी पोहचले असून दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत तर दोघांचा अजूनही शोध सुरू आहे.
अंत्यविधीसाठी जात असलेली टाटा सुमो खड्ड्यात गेल्याने भीषण अपघात, 12 जण गंभीर जखमी
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन जवळ अंत्यविधीसाठी जात असलेल्या नातेवाईकांच्या टाटा सुमो कारचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात टाटा सुमो कार एका मोठ्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात कार चालकासह 12 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: गोदावरी नदी