मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : औरंगाबादेत लग्न मंडपातून 36 लाखांच्या दागिन्यांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

Aurangabad : औरंगाबादेत लग्न मंडपातून 36 लाखांच्या दागिन्यांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

लग्नात पाहुणे म्हणून आले अन् 36 लाखांचे दागिने घेऊन पळाले, घटनेचा LIVE VIDEO

लग्नात पाहुणे म्हणून आले अन् 36 लाखांचे दागिने घेऊन पळाले, घटनेचा LIVE VIDEO

Gold ornaments stolen from Marriage ceremony, caught in cctv: लग्नसमारंभात पाहुण म्हणून आलेल्या मुलांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅगच लांबवल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे.

औरंगाबाद, 8 डिसेंबर : लग्न समारंभात (Marriage ceremony) पाहुणे म्हणून आलेल्या दोघांनी सोने-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅक (Gold ornaments) लांबवल्याची घटना समोर आली आहे. या बॅगेत तब्बल 36 लाखांचे दागिने होते. औरंगाबाद (Aurangabad)मधील सूर्या लॉन येथे आयोजित लग्न समारंभात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. (Gold ornaments bag stolen from marriage ceremony, incident caught in CCTV)

औरंगाबाद येथे भर लग्नातून दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरी गेली आहे. ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती. शहरातील सुर्या लॉन्स मध्ये लग्न सोहळा सुरू असतांना एक अल्पवयीन मुलाने ही बॅग लग्न गडबड सुरू असताना लांबवली. या बॅगेत जवळपास 36 लाख रुपयांचे दागदागिने आणि रोोख रक्कम होती. आठ दिवसांनंतर ही बॅग कशी चोरी गेली याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आहे.

या सीसीटीव्हीत दिसत आहे की, एक अल्पवयीन मुलगा लग्न समारंभातून बॅग घेऊन हॉल बाहेर पळत जात आहे. हॉल बाहेर आल्यानंतर तो एका कारमध्ये बसतो आणि त्याच गाडीत इतर इसमही मुलाच्या पाठोपाठ बसताना दिसत आहे. याचा अर्थ सरळ आहे लहान मुलांचा वापर अश्या चोरींमध्ये केला जात आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी मात्र अजून हाती लागलेला नाही.

वाचा : कॉलेजच्या गेटसमोरून केलं अपहरण; बळजबरीनं लग्न लावत युवतीवर बलात्कार

चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोीपंचा शोध घेत आहेत. आरोपी हे एका फोर व्हीलरमधून गेले होते. या फोर व्हीलरचाही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान लग्नसमारंभात इतक्या गर्दीतून लहानग्याने 36 लाखांचे दागदागिने असलेली बॅग पळवल्याने खळबळ उडाली आहे.

बंदुकीचा धाक दाखवून दरोडा

पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे दुकानावर दरोडा पडला आहे. चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (7 डिसेंबर) रात्री साडेदहा वाजता घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Robbery caught in cctv) झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथील बोरी बुद्रुक येथे अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन त्यांना बंदुकीचा धाक दाखविला. बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

First published:

Tags: Aurangabad, Cctv footage, Crime