मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संसार मोडं अन् माझ्यासोबत संबंध ठेव, 30 वर्षांचा तरुण महिलेला कंटाळला, अखेर...

संसार मोडं अन् माझ्यासोबत संबंध ठेव, 30 वर्षांचा तरुण महिलेला कंटाळला, अखेर...


मृत तरुण गणेश मुसळे याचे गावात राहत असलेल्या एका महिलेसोबत काही महिन्यांपासून अनैतिक संबंध होते.

मृत तरुण गणेश मुसळे याचे गावात राहत असलेल्या एका महिलेसोबत काही महिन्यांपासून अनैतिक संबंध होते.

मृत तरुण गणेश मुसळे याचे गावात राहत असलेल्या एका महिलेसोबत काही महिन्यांपासून अनैतिक संबंध होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India
  • Published by:  sachin Salve

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 04 सप्टेंबर : महिलेची अनैतिक संबंध (immoral relationship) ठेवणाऱ्या तरुणाला अखेर आपला जीव गमवावा लागला आहे. बायकोला सोडून माझ्यासोबत राहा असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या ( commits suicide) केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील लोहगाव इथं ही घटना घडली आहे. 30 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन शनिवारी सकाळी आत्महत्या केली होती. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव गणेश सुभाष मुसळे ( रा. लोहगाव ता.पैठण) असं आहे.

(अल्पवयीन मुलाने आईचा हातोड्याने खून करून पेटीत कोंबला मृतदेह; एक बकरी ठरली हत्येचं कारण)

मृत तरुण गणेश मुसळे याचे गावात राहत असलेल्या एका महिलेसोबत काही महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. या महिलेनं 'माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवून लग्न कर आणि तुझ्या पत्नीला सोडून माझ्यासोबत संसार कर' म्हणून खूप दिवसापासून तगादा लावला होता. तसंच शेजारी घर असल्याने प्रत्यक्षात भेटून सुद्धा या गोष्टी सदरील महिला बोलत होती. त्यामुळे शेजारी दोघांच्या संबंधांबाबत कुजबूज सुरू होती. या सगळ्या गोष्टीच्या मानसिक ताणाला कंटाळून शनिवारी सकाळी गणेश मुसळे याने आत्महत्या केली होती.

(दोन घटनांनी महाराष्ट्र हादरलं! पतीसोबत वाद, 2 चिमुकल्यांना विष पाजलं आणि...)

या प्रकरणी मुसळेच्या पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. सदरील महिलेविरोधात गणेशच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार बिडकीन पोलीस ठाण्यात भादवि. 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि.महेश जाधव हे करत आहे.

First published: