मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कंपनीत जाणाऱ्या 2 बहिणी आणि भावाला ट्रकने चिरडलं, औरंगाबाद हळहळलं

कंपनीत जाणाऱ्या 2 बहिणी आणि भावाला ट्रकने चिरडलं, औरंगाबाद हळहळलं

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे तिघेही खाली पडले आणि ट्रकच्या पाठी मागच्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेले.

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे तिघेही खाली पडले आणि ट्रकच्या पाठी मागच्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेले.

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे तिघेही खाली पडले आणि ट्रकच्या पाठी मागच्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India
  • Published by:  sachin Salve

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 24 नोव्हेंबर : औरंगाबाद शहरातील वाळूजमध्ये हृदयद्रावक अपघात घडला आहे. या अपघातात एकाच परिवारातील भाऊ आणि दोन बहिणीचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील 3 जणांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळूजमध्ये औद्योगिक वसाहतीत माल घेऊन जाणारी ट्रक आणि कंपनीत जाणाऱ्या कामगाराच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्याजवळ झाला.

(उकळती भाजी साडेतीन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडली, अन्.., थरकाप उडवणारी घटना)

आसाराम बापूनगर, कमळापूर इथं राहणारे अनिता कचरू लोखंडे (वय 22) आणि निकिता कचरू लोखंडे (वय 18) या दोघी बहिणी वाळूज औद्योगिक वसाहतीतील रेणुका ऑटो कंपनीमध्ये काम करतात. आज सकाळी नेहमी प्रमाणे सात वाजेच्या सुमारास या दोघ्या बहिणींना दीपक भाऊ कचरू लोखंडे हा आपल्या दुचाकीवर कंपनीत सोडण्यासाठी निघाला होता. रांजणगाव फाट्या जवळून पुढे जाताच मॅन डिझेल कंपनीच्या समोर त्यांच्या पल्सर दुचाकी (एमएच 21,ए एम – 6995)आणि ट्रक (एमएच 04, एफजे – 5288) यांच्यात अपघात झाला.

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे तिघेही खाली पडले आणि ट्रकच्या पाठी मागच्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

(1500 फूट उंचीवर असलेल्या धबधब्यावर अंघोळ करत होते, पाय घसरला आणि...)

या भीषण अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले, पोलीस कॉन्स्टेबल संजय बनकर व वाहतूक शाखेचे देविदास दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

First published:

Tags: Marathi news