मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

औरंगाबाद : विचित्र तिहेरी अपघात; दुचाक्यांची धडक अन् 2 तरुण उडून ट्रॅक्टरखाली, जागीच मृत्यू

औरंगाबाद : विचित्र तिहेरी अपघात; दुचाक्यांची धडक अन् 2 तरुण उडून ट्रॅक्टरखाली, जागीच मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला. यानंतर दुचाकीवरीलशैलेश मुळे आणि अमोल खंडागळे जवळून जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर खाली आले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Kiran Pharate

अविनाश कानडजे, औरंगाबाद 23 नोव्हेंबर : औरंगाबादमधून भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. यात तिहेरी अपघातात पैठण येथील दोन युवक ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. यात दोन दुचाकींचा अपघात होऊन उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.

नागपुरातील मिरची मार्केटमध्ये आग; कोट्यवधींचं नुकसान, घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO

पैठण आपेगाव रोडवर वडवाडी गावाच्या अलीकडे हा अपघात झाला. दोन मोटरसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन युवक ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला. यानंतर दुचाकीवरीलशैलेश मुळे आणि अमोल खंडागळे जवळून जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर खाली आले. या घटनेत दोघेही जागीच ठार झाले. तर दोन जखमी तरुणांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

रायगडमध्येही अपघात -

दरम्यान रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासुन हळूहळू थंडीचे प्रमाण वाढत आहे. याचा परीणाम दक्षिण रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. धुक्याची चादर पसरताना दिसत आहे. या वाढत्या धुक्यामुळे आज पहाटेच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर दासगाव आणि वीर गावच्या दरम्यान तीन अपघात झाले आहेत.

पालघर आणि नाशिक भूकंपाने हादरलं; राज्यात पहाटेच जाणवले धक्के

धुक्यामुळे समोरून येणार्‍या वाहनांचा अंदाज न आल्याने कंटेनर चालकाचा गाडीवरून ताबा सुटला आणि अपघात झाला. याच दरम्यान मुंबईकडून महाडकडे येणारी कार रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली. तर दासगाव हद्दीत रत्नागिरी ते मुंबई जाणारी वेरणा रस्त्यावरील मोरीवर धडकली. या वेरणा कारमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

First published:

Tags: Accident, Aurangabad News