Home /News /maharashtra /

Aurangabad : गणेशोत्सवाला महागाईची झळ; मूर्तींच्या किंमतीत 15 ते 20 टक्के वाढ, पाहा VIDEO

Aurangabad : गणेशोत्सवाला महागाईची झळ; मूर्तींच्या किंमतीत 15 ते 20 टक्के वाढ, पाहा VIDEO

title=

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेश उत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मूर्तिकारांची 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

  औरंगाबाद, 26 जुलै: दोन वर्षांपूर्वी जगभरामध्ये कोरोना ( corona ) या संसर्गजन्य आजाराने शिरकाव  केला. यातून सर्वांचे जनजीवन ठप्प झालं. भारतात देखील निर्बंध लावण्यात आले. यामुळे सर्व सण उत्सव नियमांचे पालन करून साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच धर्मीय सण उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. पुढच्या महिन्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. ( Ganeshotsav In Aurangabad ) मात्र, वाढत्या महागाई ( inflation ) मध्ये रंग, माती आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी महागलेल्या असतील,असे मूर्तिकार सांगतात. कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेश उत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मूर्तिकारांची 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. देशातील व राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे गणेश भक्तांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

  हेही वाचा-  Osmanabad : पारंपारिक शेतीला फाटा देत 'हे' गाव करतय लाखोंची कमाई, वाचा Special Report

  महागाईचा फटका  दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अत्यावश्यक वस्तूंसह सर्वच वस्तूंच्या किमती वाढत आहेत आणि याचा परिणाम गणेश उत्सवावरही होणार आहे. यंदा गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना माती, रंग व कारागिरांचा खर्च वाढल्यामुळे महागाईचा फटका बसला याचा परिणाम मूर्तींच्या किंमतीवर देखील होणार आहे, असे मूर्तिकार मनोज धोंडारवाल म्हणतात.  माती, रंगाच्या किंमती वाढल्या गेल्या वर्षी माती 70 रुपये किलो मिळत होती. मात्र, यावर्षी तिच्या किंमतीमध्ये वाढ होऊन आता ती 200 रुपये किलो मिळत आहे. त्यासोबतच रंगाची बकेट 4 हजार 500 रुपयांना मिळत होती ती आता 5 हजार रुपये प्रमाणे मिळत आहे. यासोबतच कारागिरांच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम गणेश मूर्तींच्या किंमतीवर होणार आहे.

  हेही वाचा- Pune : खमंग कुरकुरीत डिस्को मिरची भजी बघूनच सुटेल तोंडाला पाणी, VIDEO

  गेल्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाची सावट असल्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साह कमी होता. त्याचबरोबर याचा अंदाज घेऊन मूर्तिकारांनी मूर्ती कमी केल्या होत्या. मात्र, यावर्षी मूर्तिकारांनी दुपट्टीने गणेश मूर्ती वाढवल्या आहेत. यामुळे बाजारामध्ये विविध प्रकारच्या मूर्ती  बघायला मिळणार आहेत."गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. निर्बंध मुक्त साजरा होत असलेला गणेशोत्सवासाठी दुपट्टीने गणेश मूर्ती वाढवल्या आहेत. संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच  मूर्ती बाजारात येतील", असे मूर्तिकार मनोज धोंडारवाल यांनी सांगितले.
  First published:

  Tags: Aurangabad, Aurangabad News

  पुढील बातम्या