मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नेहमीप्रमाणे सायकलवर शाळेत निघाला पण ती सकाळ शेवटची ठरली, औरंगाबादेतील हृदयद्रावक घटना

नेहमीप्रमाणे सायकलवर शाळेत निघाला पण ती सकाळ शेवटची ठरली, औरंगाबादेतील हृदयद्रावक घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आनंद हा वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील एका शाळेत नववीत शिक्षण घेत होता. दररोजप्रमाणे आनंद सायकलने महालगाव येथे शाळेत जाण्यासाठी निघाला होता. मात्र, इतक्यात काळाने त्याच्यावर घाला घातला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Kiran Pharate

अविनाश कानडजे, औरंगाबाद 13 ऑक्टोबर : नववीमध्ये शिकणारा आनंद नेहमीप्रमाणे सकाळी तयार होऊन शाळेत जाण्यासाठी निघाला. नेहमीप्रमाणे सायकलवर तो शाळेच्या रस्त्याने चालला होता. मात्र, रोज याच रस्त्याने जाताना मोठमोठी स्वप्नं पाहणाऱ्या आनंदचा याच रस्त्यावर दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक घटना औरंगाबदच्या वैजापूरजवळील बाजार फाट्यावर घडली.

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बीडमध्ये हाहाकार, दोघांचा मृत्यू

भरधाव कारने दिलेल्या धडकेत 14 वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार झाल्याची घटना वैजापूर जवळील बाजार फाट्यावर घडली आहे. आनंद अशोक जगताप असं मृत मुलाचं नाव आहे. आनंद हा वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील एका शाळेत नववीत शिक्षण घेत होता. दररोजप्रमाणे आनंद सायकलने महालगाव येथे शाळेत जाण्यासाठी निघाला होता. मात्र, इतक्यात काळाने त्याच्यावर घाला घातला.

आनंद सायकलने बाजाठाण फाट्यावर पोहोचताच त्याला भरधाव कारने पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत आनंद गंभीर जखमी झाला. यानंतर कारचालकाने त्याच वाहनातून आनंदला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. तो एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

'खर्च करूनही मुलांना नोकरी मिळणार नाही', चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख करत शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

बीडमध्येही दुर्घटना -

दरम्यान सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकातही काल दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील आयसर ट्रकने दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या 2 बांधकाम कामगारांना चिरडले. या भीषण अपघातात बांधकाम मिस्त्रीसह एक कामगार महिला जागीच ठार झाली. अनिता भारत सरपते (वय 41) आणि कालिदास विठ्ठल जाधव (वय 38) अशी मयतांची नावे आहेत.

First published:

Tags: Accident, School student, Shocking news