मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबईतील मेगा ब्लॉकचा औरंगाबादकरांना फटका, 12 रेल्वे गाड्या रद्द

मुंबईतील मेगा ब्लॉकचा औरंगाबादकरांना फटका, 12 रेल्वे गाड्या रद्द

19 आणि 20 नोव्हेंबर मुंबईतील मेगा ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. त्यामुळे याचा फटका औरंगाबादकरांना बसणार आहे.

19 आणि 20 नोव्हेंबर मुंबईतील मेगा ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. त्यामुळे याचा फटका औरंगाबादकरांना बसणार आहे.

19 आणि 20 नोव्हेंबर मुंबईतील मेगा ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. त्यामुळे याचा फटका औरंगाबादकरांना बसणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 18 नोव्हेंबर : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि मशिद बंदर या दोन रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे मराठवाड्याची संबंधित असलेल्या 12 रेल्वे गाड्या दोन दिवस बंद राहणार आहेत. 19 आणि 20 नोव्हेंबर दरम्यान या रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. त्यामुळे याचा फटका औरंगाबादकरांना बसणार आहे.

मुंबईहून नांदेड आणि नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या या गाड्यांमुळे दोन दिवसात सुमारे 20 हजार प्रवाशांना फटका बसणार आहे. शनिवार आणि रविवार असल्यामुळे या दिवशी प्रवाशांची संख्या कमी असते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि मशिद बंदर या दोन रेल्वे स्थानकांत दरम्यान रेल्वे रुळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

Aurangabad : पंतग उडवणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज, 'त्या' विक्रेत्यांवर करणार कारवाई

आलिदाबाद- मुंबई ही रेल्वे 19 नोव्हेंबरला केवळ आलिदाबाद ते दादर स्थानकादरम्यान पोहोचणार आहे. तर दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान संबंधित गाडी रद्द राहील. मराठवाड्यातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईच्या प्रवाशांसाठी 19 आणि 20 नोव्हेंबरला नांदेड आणि नांदेड मुंबईला प्रवास करायचा झाल्यास त्यांना रेल्वे व्यतिरिक्त इतर पर्यायांचा अवलंब करावा लागणार आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या सहा गाड्या रद्द

शनिवार 19 नोव्हेंबर रोजी नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस, नांदेड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस, सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस या तीन गाड्या धावणार नाहीत. तर 20 नोव्हेंबर रोजी जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस रद्द राहणार आहेत. यासोबत सोमवारी 21 नोव्हेंबर रोजी आलिदाबाद मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस धावणार नाही.

Aurangabad : शिक्षण विभागाच्या सूचनेला केराची टोपली, 2906 शाळांची सुरक्षा 'राम भरोसे'

मुंबईहून येणाऱ्या गाड्या

रविवारी 20 नोव्हेंबर रोजी मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस, मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई अलिदाबद नंदीग्राम एक्सप्रेस, मुंबई नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, मुंबई सिकंदराबाद एक्सप्रेस या पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस 21 नोव्हेंबर रोजी धावणार नसल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

First published:

Tags: Aurangabad News, Local18, Railway