मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : विद्यापीठ आवारात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कसा उभा राहिला? पाहा Inside Story

Aurangabad : विद्यापीठ आवारात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कसा उभा राहिला? पाहा Inside Story

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ धातू पासून अश्वारूढ 11 फूट उंच तर 225 किलो वजनाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

औरंगाबाद, 20 सप्टेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ धातू पासून अश्वारूढ 11 फूट उंच तर 225 किलो वजनाचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी शिल्पकार नरेंद्रसिंग साळुंखे यांनी बनवला आहे. साळुंखे यांनी 'लोकल 18' शी बोलताना हा पुतळा उभारण्याची 'इनसाईड स्टोरी' सांगितली आहे. नरेंद्रसिंग साळुंखे यांचे प्राथमिक शिक्षण अकोला जिल्ह्यामध्ये झाले. त्यानंतर ते पुढील उच्च शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये आले. कलाशिक्षण औरंगाबाद शहरातील शासकीय कला महाविद्यालयातून घेतलं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फाइन आर्ट विभागातून त्यांनी मास्टर डिग्री घेतलेली आहे. मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील असलेले नरेंद्र सिंग साळुंखे व त्यांच्या पत्नी स्वाती साळुंखे हे दोघेही दांपत्य शिल्पकार आहेत. त्यांनी शतकुंड आर्ट स्टुडिओमध्ये सहा महिने अथक परिश्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवला. 11 फूट उंच तर 225 किलो वजनाचा ब्राँझ धातू पासून पुतळा तयार करण्यासाठी तब्बल 35 लाखांचा खर्च आला.

गुगल मॅप वरून साभार खबरदार! अनधिकृतपणे झाड तोडल्यास होणार 1 लाख रुपयांचा दंड 'सर्वांच्या सहकाऱ्यामुळे शक्य' ज्या विद्यापीठात शिक्षण घेतलं त्याच विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मान मला मिळाला याचा सार्थ अभिमान मला वाटतो. विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मला समितीने त्यासोबतच वरिष्ठांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे या सर्वांच्या सहकाऱ्यामुळेच मी हा अश्वारूढ पुतळा उभारू शकलो,अशी भावना नरेंद्रसिंग साळुंखे यांनी 'लोकल 18' शी बोलताना व्यक्त केली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा ब्राँझधातूपासून बनवण्याचे टेंडर होते. ब्राँझ धातूला 3 हजार वर्षाचं आयुष्य असतं. यामुळे या धातूपासून मूर्ती बनवण्याला प्राधान्य दिलं जातं. 9 ते 10 महिने अथक परिश्रम घेऊन नरेंद्र सिंग साळुंखे व त्यांच्या पत्नी स्वाती साळुंखे हा पुतळा बनवला. 
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News

पुढील बातम्या