तरुणाने 57 मिनिटांचा VIDEO शूट केला, नंतर गळफास घेऊन केली आत्महत्या

तरुणाने 57 मिनिटांचा VIDEO शूट केला, नंतर गळफास घेऊन केली आत्महत्या

पोलिसांनी मुकेशचा मोबाईल जप्त केला असून त्यामध्ये मुकेशने मृत्यूपूर्वी केलेले 57 मिनिटांचे शुटींग आढळून आलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 14 जुलै : युवकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग चालू करून गळफास घेतल्याची घटना न्यायनगर भागात (काल) शनिवारी दुपारी घडली. मुकेश सुधाकर साळवे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी मुकेशचा मोबाईल जप्त केला असून त्यामध्ये मुकेशने मृत्यूपूर्वी केलेले 57 मिनिटांचे शुटींग आढळून आलं आहे.

पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यायनगर भागात सुधाकर साळवे यांचे कुटुंब राहते. पती-पती मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करतात. त्यांची तिन्ही मुले वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा मुकेश हा बीड बायपास भागात वॉशिंग सेंटरवर कामाला होता. संपूर्ण कुटुंब कामानिमित्त बाहेर गेलं असताना मुकेशला सुट्टी असल्याने तो घरीच होता. दुपारी 1 वाजेच्या सुमारास सुधाकर दुपारच्या जेवणासाठी घरी आले. त्यावेळी मुकेशने घराच्या छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

वडिलांनी तात्काळ घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुकेशला फासावरून उतरवून बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला दुपारी साडेतीन वाजता मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळावरून मृत मुकेशचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये 57 मिनिटांचे शुटींग आहे. मुकेशने कोणत्या कारणामुळे गळफास घेतला हे अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी पुंडलिनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली, अशी माहिती उपनिरीक्षक विकास खटके यांनी दिली.

दरम्यान, मृत मुकेशने मृत्यूपूर्वी एक 18 सेकंदाचा व्हिडिओदेखील तयार केला आहे. त्यामध्ये त्याने माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, असं म्हटलं आहे.

कृष्णा नदीपात्रात 12 फूट मगरीचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 14, 2019, 2:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading