10 सेकंदात रस्त्यानं चालणाऱ्या तरुणानं सोडले प्राण, अंगावर शहारे आणणारा VIDEO

10 सेकंदात रस्त्यानं चालणाऱ्या तरुणानं सोडले प्राण, अंगावर शहारे आणणारा VIDEO

नियंत्रण सुटलं आणि रस्त्यानं चालणाऱ्या तरुणाला एका क्षणात चिरडलं, पाहा VIDEO

  • Share this:

औरंगाबाद, 13 ऑगस्ट : काळ कधी कुठे आणि कसा आपला घात करेल सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये (aurangabad news) घडली आहे. रस्त्याच्या कडेनं चालणाऱ्या व्यक्तीला ट्रकनं चिरडल्याचा भयंकर प्रकार समोर आला. ही घटना सीसीटीव्ही (CCTV VIDEO) कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (video viral) होत आहे.

रुस्तुम लक्ष्मण राजुळे असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मागून येणाऱ्या ट्रकनं चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या काही सेकंदात चालत्या फिरत्या या व्यक्तीवर काळानं घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हे वाचा-सुशांतच्या डायरीची 15 पानं आली समोर; बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा केला होता प्लान

मिळालेल्या माहितीनुसार रुस्तुम लक्ष्मण राजुळे हे बँकेत जाण्यासाठी सकाळी निघाले होते. रस्त्याच्या एका कडेन चालत असताना अचानक मागून ट्रक आला आणि त्यानं धडक दिली. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की रस्ता अरुंद असल्यानं चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं असावं.

बँकेत जाण्यासाठी निघालेले रुस्तुम पुन्हा परतलेच नाहीत. ट्रकनं चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना औरंगाबादच्या वाळूज परिसरात घडली. सीसीटीव्हीच्या आधारे ट्रक चालकाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 13, 2020, 9:00 AM IST

ताज्या बातम्या