औरंगाबादमध्ये शिवसेना आणि MIM आमनेसामने, सामाजिक तेढ पसरवणारे व्हिडिओ व्हायरल

औरंगाबादमध्ये शिवसेना आणि MIM आमनेसामने, सामाजिक तेढ पसरवणारे व्हिडिओ व्हायरल

औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा आरोप MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना नेत्यांवर आरोप केला आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मात्र इम्तियाज जलील यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम

औरंगाबाद, 27 मे : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून गेल्या 25 वर्षांची मक्तेदारी मोडीत काढत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील खासदार झाले.औरंगाबाद लोकसभेचा निकाल जाहीर होऊन चार दिवसही उलटले नाही तोच शहरात धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याचा आरोप होतोय.

जलील यांचा शिवसेनेवर आरोप

गेल्या चार दिवसात शहरात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओंची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना नेत्यांकडूनच हे प्रकार केले जात आहेत, असा थेट आरोप औरंगाबादचे नवे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

औरंगाबाद शहर संवेदनशील शहर आहे याची मला कल्पना आहे. मी फक्त दलित आणि मुसलमानांचा खासदार नाही तर हिंदूंचाही खासदार आहे. त्यामुळे औरंगाबादमधल्या सगळ्याच नागरिकांची सुरक्षा ही आता माझी जबाबदारी आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले. जो चुकीचं काम करेल त्याला पोलीस सोडणार नाहीत, असा विश्वासही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं सपाटून मार खाल्ला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, या शब्दात इम्तियाज जलील यांनी शिवसेना नेत्यांवर आरोप केले.

शिवसेनेचं उत्तर

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मात्र इम्तियाज जलील यांचे आरोप फेटाळून लावले. औरंगाबादमध्ये सामाजिक सलोखा राखणं ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे, असंही त्या म्हणाल्या.

औरंगाबादमध्ये सलग 20 वर्षं खासदार राहिलेले शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा इथे पराभव झाला. त्यामुळे शिवसेना आणि MIM मध्ये राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. पण गेल्या दोन दशकांत औरंगाबादचा पाणीप्रश्न आणि कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर शहरातल्या नेत्यांनी राजकारण करण्यापेक्षा शहराच्या विकासासाठी एकत्र यावं, अशी औरंगाबादकरांची अपेक्षा आहे.

First published: May 27, 2019, 4:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading