सचिन जिरे,औरंगाबाद, 26 सप्टेंबर : लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय ठप्प झाले. यामध्ये अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या व्यवसायांचाही समावेश होता. मात्र आता औरंगाबाद शहरात स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली देहव्यापराचा सुरू असलेला प्रकार उघड झाला आहे. याबाबत पुंडलीकनगर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी सिडको एन-4 भागात धाड टाकत चार तरुणी व दोन ग्राहकांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गुरुवारी शहरातील स्पा मसाज सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीने पोलीस आयुकत निखिल गुप्ता यांच्याकडे स्पाच्या नावाखाली देह व्यापार केला जात असल्याची तक्रार केली होती.
त्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आणि कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्या.पुंडलीक नगर पोलिसांनी सिडको भागातील येलोरा स्पा सेंटरमध्ये एक बनावट ग्राहक पाठवला व त्या ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये चार तरुणींना ताब्यात घेतले तर दोन ग्राहकांना देखील अटक करण्यात आली आहे.
घटनस्थळी पोलिसांना 8 कंडोमचे पाकीट मिळाले असून पोलिसांनी ते हस्तगत केले. दोन हजार ते पाच हजार रुपयात या ठिकाणी तरुणींकडून देह व्यापार करून घेतले जात होते. या स्पाचा मालक नाशिक येथे असून हा देहव्यापराचा धंदा ऑनलाइन पद्धतीने देखील चालविला जात असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Sex racket