विद्यार्थ्यांना खेळायला पाठवून झोपा काढणारे मास्तर कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

विद्यार्थ्यांना खेळायला पाठवून  झोपा काढणारे मास्तर कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

ही घटना आहे लाडसावंगी जवळील कनकोरा गावातील आणि शिक्षकाचे नाव आहे राजू शिंदे.

  • Share this:

औरंगाबाद, 04 जुलै : ग्रामीण भागात शिक्षक येतच नाही, काही शिक्षक मद्यप्राशन करून येतात या घटना आपल्याला माहीत आहेत. मात्र आता नवा प्रकार समोर आलाय.  शिक्षक चक्क वर्गात मस्त झोप काढतानाचा. ही घटना आहे लाडसावंगी जवळील कनकोरा गावातील आणि शिक्षकाचे नाव आहे राजू शिंदे.

हेही वाचा

अमरनाथ यात्रेदरम्यान दरड कोसळली, 5 जणांचा मृत्यू

सुप्रीम कोर्टाचा 'आप'ला दिलासा, राज्यपालांनी मंत्रिमंडळाचे निर्णय मान्य करणं आवश्यक

नोबल पुरस्कार विजेती मलालावरच्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज

राजू शिंदे हे नेहमी झोपण्याआधी विद्यार्थ्यांना खेळाचा तास म्हणून बाहेर पाठवतात. विद्यार्थी बाहेर गेले की मुलांचे दप्तर उशाला घेऊन चक्क झोपा काढतात, अशा तक्रारी मुलांनी केल्या. मात्र पालकांनी लक्ष दिले नाही.

मात्र काल एका सजग पालकाने हा प्रकार मोबालमध्ये चित्रित केला. प्रकार कळताच गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले आणि शिक्षक राजू शिंदे याला फैलावर घेतले. मध्यस्थी आणि राजू शिंदे यांच्या न झोपण्याच्या आश्वासननंतर गावकऱ्यांनी शाळेचे कुलूप उघडले.

First published: July 4, 2018, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading