औरंगाबाद : राज ठाकरेंनी तीन दिवसांचा दौरा दोन दिवसात गुंडाळला

औरंगाबाद : राज ठाकरेंनी तीन दिवसांचा दौरा दोन दिवसात गुंडाळला

मुंबईतल्या भव्य अशा मोर्चानंतर राज ठाकरेंनी मिशन संभाजीनगर हाती घेतलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 14 फेब्रुवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या त्यांनी पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा केली. राज ठाकरे हे औरंगाबादच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते. मात्र अचानकच त्याच्या कार्यक्रमांमध्ये बदल झाल्याने तीन दिवसांचा दौरा आता केवळ दोन दिवसात गुंडाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या भव्य अशा मोर्चानंतर राज ठाकरेंनी मिशन संभाजीनगर हाती घेतलं आहे. यासाठी ते औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याचा दुसरा दिवस होता. तिसरा दिवसही ते औरंगाबादेत राहून भेटीगाठी करणार होते. मात्र अचानकच त्यांनी कार्यक्रमात बदल करीत आजच कार्यक्रम गुंडाळला आहे. उद्या सकाळी ते पहाटे मुंबईसाठी निघणार आहेत. त्यामुळे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेशी बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या भाष्य केलं. शरद पवारांचे आणि माझे वैयक्तिक संबंध आहेत. EVM संदर्भात बोलण्यासाठी त्यांना भेटलो होतो. पण आमच्या मैत्रीच्या चर्चा रंगवल्या गेल्या. पवारांशी माझे चांगले संबंध असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मी पक्षाचा झेंडा बदलला आहे, पक्षाची भूमिका तीच आहे. काही लोकांनी आपल्या भूमिका बदलल्या आणि सत्तेत आले. त्यांनी जाब विचारण्याची कोणाची हिमत्त नाही. मी मांडलेल्या मुद्द्यांवर अद्याप कोणताही पक्ष बोललेला नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

पुलवामा हल्ला संशयास्पद

आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा एक वर्ष पूर्ण झाले आहे. पुलवामा हल्ला हा घटवून आणला होता अशी आक्रमक प्रतिक्रिया त्यावेळी राज ठाकरेंनी दिली होती. यासंबंधी प्रश्न विचारला असता पुलवामा हल्ल्यामध्ये अनेक संशयास्पद पुरावे समोर आले होते असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.

यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी बिनधास्त चर्चा केली. मनसेनं मोटारसायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं. दुपारी काही पदाधिकारी यांच्यासोबत बैठक आणि सायंकाळी चार वाजता मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत राज ठाकरे यांनी चर्चा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2020 02:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading