कोरोनाचं संकट गडद होत असताना नागरिकांचा बेजाबदारपणा, पोलिसांनी हॉटेलमधून 28 जणांना घेतलं ताब्यात

कोरोनाचं संकट गडद होत असताना नागरिकांचा बेजाबदारपणा, पोलिसांनी हॉटेलमधून 28 जणांना घेतलं ताब्यात

हॉटेल दरबारवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून हॉटेल मालकासह 28 जणांना ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 13 ऑगस्ट : विनापरवाना दारूचा अड्डा सुरू असलेल्या बीड बायपास वरील हॉटेल दरबारवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून हॉटेल मालकासह 28 जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी बार बंद ठेवण्याचे आदेश असताना बीड बायपास येथे एका हॉटेलात मोठ्या प्रमाणात दारूच्या ओल्या पार्टी होत असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल सह हवालदार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंखे, प्रकाश चव्हाण यांच्या पथकाने मध्यरात्री हॉटेल दरबारवर छापा टाकला.

या हॉटेलवर शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांना पायदळी तुडवत मद्यपी गर्दी करून तोंडाला मास्क न लावता सोशल डिस्टनसिंग न पाळता दारू रिचवत होते. पोलिसांनी हॉटेल चालक बालाजी माणिकराव खोकले (रा.सातारा परिसर) याच्यासह दोन वेटर आणि पंचवीस ग्राहक असे 28 जणांना पकडले.

ताब्यात घेण्यात आलेल्या 28 जणांविरोधात विविध कलमाखाली पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे, पो.निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने केली.

Published by: Akshay Shitole
First published: August 13, 2020, 4:45 PM IST

ताज्या बातम्या