Home /News /maharashtra /

Aurangabad News : औरंगाबादेत कोरोनामुळे मृत्यूतांडव, एकाच दिवसात 28 जणांचा मृत्यू

Aurangabad News : औरंगाबादेत कोरोनामुळे मृत्यूतांडव, एकाच दिवसात 28 जणांचा मृत्यू

शनिवारी रात्रीपर्यंत एकाच दिवसात 1715 नवीन रुग्णाची भर पडली आहे.

    औरंगाबाद, 28 मार्च : औरंगाबाद (Aurangabad) शहरात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. शहरात मिनी लॉकडाउन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. पण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी आहे. शहरात एकाच दिवसात तब्बल 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1715 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  शनिवारी रात्रीपर्यंत एकाच दिवसात 1715 नवीन रुग्णाची भर पडली तर एकाच दिवसात तब्बल 28 जणांचा मृत्यू झाला. ‘माझी सख्खी बायको गेली’ हे गाणं कसं तयार झालं? पाहा संगीतकाराचा भन्नाट किस्सा जिल्ह्यात शनिवारी 1060 जणांना (मनपा 900, ग्रामीण 160) सु्ट्टी देण्यात आली. आजपर्यंत 60228 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1715 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77350 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1559 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15563 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 'नवरोबा, आपल्या बाळाला गमावलं, पुढच्या जन्मी नव्याने सुरुवात करू', दीपालींचं भाव दरम्यान,  शहरातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता येत्या 30 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान लॉकडाउन लागू करण्यात आलेला आहे. यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे तर जीवनावश्यक वस्तूंसाठी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंतची वेळ दिलेला आहे. 12 वाजेदरम्यान नियम मोडणाऱ्या वरती थेट गुन्हे दाखल करणार आहेत. लॉकडाउनमध्ये काय आहे नियम 1. कोणत्‍याही परिस्थितीत 5 पेक्षा जास्‍त लोकांनी सार्वजनिक जागेत एकत्र येण्‍यास प्रतिबंध असेल. 2. सार्वजनिक /खाजगी क्रीडांगणे/मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning walk, Evening walk इत्‍यादी प्रतिबंधीत राहिल. 3. उपहार गृह, बार, लॉज, हॉटेल्‍स (कोविड-19 करिता वापरात असलेले वगळून) रिसॉर्ट, शॉपींग मॉल, बाजार, मार्केट संपूर्णतः बद राहतील. 4. हॉटेल मधील आसनव्‍यवस्‍थेसह जेवणाची सूविधा (डायनिंग) बंद राहिल मात्र निवासी असलेल्‍या यात्रेकरुना त्‍यांच्‍या  खोलीमध्‍ये भोजन व्‍यवस्‍थेस परवानगी राहिल. 5. सर्व केश कर्तनालय/सलुन/ब्‍युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील. 6. शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. तथापी ऑनलाईन वर्ग सुरु राहतील. 7. स्‍थानिक (Local),सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी परिशिष्‍ठ ‘ब’ मध्‍ये नमूद केलेल्‍या सुट व्‍यतिरिक्‍त संपूर्णतः बंद राहतील. तथापी, अत्‍यावश्‍यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्‍त वाहने व वैद्यकीय कारणास्‍तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर पूर्णवेळ अनुज्ञेय राहिल. अॅटोमध्‍ये फक्‍त  2 प्रवाशांना मास्‍क सह प्रवास अनुज्ञेय राहिल. 8. स्‍थानिक (Local), सार्वजनिक  व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्‍पो, ट्रेलर, ट्रॅक्‍टर इत्‍यादींसाठी संपूर्णतः बंद राहतील तथापी, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे औरंगाबाद महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचारी व वाहनांना सदरच्‍या आदेशानुसार वगळण्‍यात येत आहेत. तसेच अत्‍यावश्‍यक सेवा व वस्‍तु यांचा पुरवठा करणारी घाऊक/ किरकोळ वाहतूक सदरच्‍या आदेशातून वगळण्‍यात येत आहे. सार्वजनिक व खाजगी जीवनावश्‍यक सेवांची तथा इतर वाहतूक (उदा. दूध, किराणा माल,पेट्रोल, डिझेल,गॅस, उद्योगांना इ.)सुरु राहिल. 9. सर्व प्रकारचे बांधकाम / कन्‍स्‍ट्रक्‍शनची कामे संपूर्णतः बंद राहतील, तथापी ज्‍या बांधकामाच्‍या जागेवर कामगारांची निवास व्‍यवस्‍था (On – Site Construction) असेल तरच त्‍यांना काम सुरू ठेवता येईल. 10. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा,जलतरण तलाव,करमणूक उदयोग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद राहतील. 11. मंगल कार्यालय, हॉल, लग्‍न समारंभ, स्‍वागत समारंभ, वाढदिवस,लग्‍नाचा वाढदिवस असे कार्यक्रम सार्वजनिकरित्‍या करता येणार नाहीत. या आदेशानुसार लागू करण्‍यात येत असलेल्‍या संचारबंदीच्‍या कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह (Registered Marriage) अनुज्ञेय असेल. 12. सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/सांस्‍कृतिक/धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील. 13. धार्मिक स्‍थळे/सार्वजनिक प्रार्थनास्‍थळे संपूर्णतः बंद राहतील. तथापी नियमित दैनंदिन धार्मिक विधी पुजाअर्चा चालू राहतील. याकामी संबंधीत पुजारी/धर्मगुरु/पाद्री इ. यांच्यासह फक्‍त एका व्‍यक्‍तीस परवानगी राहिल. 14. सर्व प्रकारचे मोर्चा, धरणे आंदोलन, उपोषण इ. वर निर्बंध राहतील. 15. सर्व देशी/विदेशी वाईन इ.मद्य विक्रीचे दुकाने बंद राहतील. 16. विविध निवडणुकीच्‍या निकालानंतर विजयी मिरवणुकीस बंदी असेल.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Aurangabad, औरंगाबाद

    पुढील बातम्या