औरंगाबाद, 10 जून : रणरणत्या उन्हात अचानक भरून आलेले ढग, सोसाट्याचा वारा आणि त्यापाठोपाठ झालेल्या गारांच्या पावसाने औरंगाबादकरांना थोडसं सुखावलं. ग्रामीण भागात या अवकाळी पावसाने नुकसान व्हायची शक्यता असली, तरी शहरात मात्र मुसळधार पाऊस आणि सोबत गारा पडल्याने नागरिकांना अंगाची लाही करणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने पुढचे दोन दिवस राज्यावर त्याचा परिणाम याच स्वरूपात दिसण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मान्सूनचं केरळात आगमन झाल्यानंतर राज्यात बहुतेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत रणरणतं ऊन आणि दुपारनंतर ढग आणि सोसाट्याचा वारा असं वातावरण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होतं. पुढचे दोन दिवस हवामान असंच राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 15 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्याचा जोर इतका जोरात होता की जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजस्थंब खाली कोसळला. ध्वजस्थंभ कोसळताना जवळच असलेले अय्युब खान या नागरिकाने तिरंगा जमिनीवर पडू नये यासाठी नागरिकांना एकत्र करून स्थंब हातात पकडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नंतर ध्वज काढला. त्यांनतर स्थंभ बाजूला काढण्यात आला.
देवेंद्र फडणवीस पळवणार का बारामतीच्या तोंडचं पाणी ?
अरबी समुद्रात 14 जूनला चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचा किनारपट्टी भागात फार मोठा परिणाम जाणवणार आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जूनला अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात काल पडलेला पाऊस हा वळवाचा पाऊस होता. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृष्य परीस्थिती निर्माण होत आहे.
'वायू' असं या चक्रीवादळाचं नाव आहे. या वादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोणताही धोका नसला तरी त्यामुळे कोकणात चांगला पाऊस पडेल असा अंदाज मुंबई हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईत चार जणांचा जीव घेणारा खड्डा अजूनही तसाच !
त्यामुळे पुढच्या काही दिवस समुद्रात मासेमारांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात पडलेला पाऊस हा अतिउष्णतेमुळे पडलेला वळवाचा पाऊस आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृष्य परीस्थिती निर्माण होत आहे. या चक्रीवादळाला 'वायू' हे नाव देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर जात गुजरात सौराष्ट्रच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे.
या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह कोकण भागात चांगला पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला अती सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही अरबी समुद्रात जाऊ नये अशा सुचना जारी करण्यात आल्या आहेत.
औरंगाबादेत बारचालकाची ग्राहकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी अवकाळी आलेल्या पावसाने शेतीचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं. तर जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून 14 जून दरम्यान मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. 11 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्लीच्या पालम इथे 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतात लू अर्थात धुळीची वादळं अजून वाढण्याची शक्यता आहे. मध्य भारत आणि उत्तर भारतात तापमान या पुढच्या आठवड्यातही जास्त राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी समाधानकारण वातावरण असून ते असंच कायम राहिलं तर जुलैच्या पहिल्या - दुसऱ्या आठवड्यापर्यंत भारताच्या बहुतेक भागात मान्सूनचा पाऊस पोहोचलेला असेल असा अंदाज आहे.
VIDEO : दानवेंच्या कार्यक्रमासाठी महिलांना वाटल्या 500-500 च्या नोटा