मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुख्यमंत्री कार्यालयाकडून शेअर झालेल्या या फोटोची का होते आहे चर्चा? पुन्हा राजकारण रंगणार का?

मुख्यमंत्री कार्यालयाकडून शेअर झालेल्या या फोटोची का होते आहे चर्चा? पुन्हा राजकारण रंगणार का?

CM ऑफिसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (CMO Maharashtra) काँग्रेसच्या मंत्र्यांच्या फोटोसह ही पोस्ट ट्वीट करण्यात आला आहे. शिवसेना- काँग्रेसमुळे आघाडीत पुन्हा होणार का कलह?

CM ऑफिसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (CMO Maharashtra) काँग्रेसच्या मंत्र्यांच्या फोटोसह ही पोस्ट ट्वीट करण्यात आला आहे. शिवसेना- काँग्रेसमुळे आघाडीत पुन्हा होणार का कलह?

CM ऑफिसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (CMO Maharashtra) काँग्रेसच्या मंत्र्यांच्या फोटोसह ही पोस्ट ट्वीट करण्यात आला आहे. शिवसेना- काँग्रेसमुळे आघाडीत पुन्हा होणार का कलह?

  मुंबई, 6 जानेवारी: औरंगाबाद शहराचं नामकरण करण्यावरून आघाडीत बिघाडी होते का, अशी परिस्थिती आहे. शिवसेना पूर्वीपासूनच या शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करत आली आहे. आता मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे आल्यानंतर या शहराचं अधिकृत नामांतर होईल, अशी शिवसैनिकांना अपेक्षा आहे. पण आघाडीतल्या काँग्रेसचा या नामांतराला विरोध आहे. तीन पक्षांचं सरकार येण्याआधी तयार केलेल्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा विषय होता की नव्हता यावरून खरं-खोटं झाला, आता मुख्यमंत्री कार्यालयातून प्रसारित केल्या जाणाऱ्या माहितीच्या पोस्टरवर चक्क काँग्रेसच्या मंत्र्यांचा फोटो आणि संभाजीनगर उल्लेख असं जाहीर झालं आहे. यावरून पुन्हा काँग्रेस- शिवसेनेत धुसफूस होणार का? अशी चर्चा आहे.

  औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून केली जात आहे. मात्र या मागणीला काँग्रेसने विरोध केल्यामुळे आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली गेली. त्यानंतर आता शिवसेनेनं पुन्हा एकदा या नामांतराविषयी रोखठोक भूमिका मांडली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असल्यानेच पुन्हा नामांतराच्या विषयाला हवा दिली जात आहे. नामांतरासाठी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने नामांतराचा निर्णय घेतल्यास हा बदल होईल.

  दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर (CMO Maharashtra) काँग्रेसच्या मंत्र्याच्या फोटोसह औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून पुन्हा आघाडीचं अंतर्गत वातावरण तापणार का, अशी चर्चा होते आहे. CMO कडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतले निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्यात एक निर्णय औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयाविषयी आहे. या निर्णयाची माहिती देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काँग्रेसच्या अमित देशमुखांचा फोटो लावण्यात आला आहे.

  हे वाचा - पुण्याचं नामांतर 'जिजापूर' करा, औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यानंतर आता या मागणीला जोर

   वरच्या माहितीत औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे.  संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयात नव्याने 165 खाटा 360 पदांच्या निर्मितीस मान्यता, असं लिहून खाली वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचं नाव आणि फोटो आहे.

  या फोटोवरून आता नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने एक ट्वीट करत संभाजीनगरला असलेला विरोध जाहीर केला आहे. तीव्र शब्दात त्यांनी हा विरोध असा दर्शवला आहे.

  नामांतर वादाचा इतिहास

  शिवसेनेनी जून 1995 मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महानगरपालिकेत नामांतराचा प्रस्ताव मांडला होता आणि पासही करून घेतला होता पण काँग्रेसच्या नगरसेवकाने त्याला विरोध करत पहिल्यांदा उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

  हे वाचा - नामांतराच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेले औरंगाबादचा काय आहे इतिहास? आफ्रिकी गुलामाने केली होती मदत

   औरंगाबादेत नामांतर झालं तर आपल्या मुस्लीम व्होटबँकेला धक्का लागेल अशी भीती काँग्रेसच्या मनात असल्याने त्यांनी नामांतराला विरोध केला आहे. मुस्लिमांना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (AIMIM) पक्षाचा आधार वाटत असल्यानेही काँग्रेस भयभीत झाली आहे. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात असणाऱ्या या शहराला मुघल बादशहा औरंगजेबाचं नाव देण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे अतोनात हाल करून औरंगजेबाने 1689 मध्ये त्यांची हत्या केली होती.

  First published:

  Tags: Aurangabad, Congress, Maharashtra, Shiv sena