27 वर्षांचं नातं तुटलं, महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात भाजप सत्तेतून बाहेर

27 वर्षांचं नातं तुटलं, महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात भाजप सत्तेतून बाहेर

'या' एकमेव कारणामुळे भाजपने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 13 डिसेंबर: राज्यातील भाजप सेना युती तुटल्याचे पडसाद औरंगाबादमध्ये स्थानिक पातळीवर दिसून आले आहेत. औरंगाबाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शुक्रवारी सकाळी भाजपच्या उपमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील युती तुटल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून याची भिती असतानाच शुक्रवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रकार घडला आहे. जवळपास 27 वर्ष एकत्र पालिकेत नांदलेल्या भाजप-सेनेच्या नगरसेवकांनी आता काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरीही औरंगाबाद पालिकेत उपमहापौर पदाच्या राजीनाम्यानं चर्चांना उधाण आलं आहे. विजय औताडेंसह भाजपच्या 22 नगरसेवकांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानं शिवसेनेला स्थानिक पातळीवर मोठा पडका बसण्याची शक्यता आहे.

राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय

औरंगाबाद पालिकेचा विचार करायचा झाला तर गेली 27 वर्ष भाजप-सेना एकत्र युतीत निवडणुका लढवत आहे. त्यांना अपक्षांचा पाठिंबा असल्यामुळे दोघांची सत्ता आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील युतीचं गणित बिघडलं आणि महाविकासआघाडीचं सरकार आल्यानं त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर दिसायला लागले. मागच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र न बसता वेगवेगळे बसल्यामुळे काहीशी कुजबूज होत असतानाच शुक्रवारी उपमहापौरांनी दिलेला राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. शुक्रवारी सकाळी पालिकेची सर्वसाधारण सभा होताच भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी महापौरांशोजारी बसणं टाळलं. याबाबत त्यांना विचारलं असता राज्यातील युती तुटली आहे आणि भाजप महाविकासआघाडी विरोधात असताना औरंगाबादमध्ये युती अद्याप कशी या प्रश्नांना उत्तर द्याली लागत आहेत असं उपमहापौर विजय औताडे यांनी सांगितलं. असं असेल तर मी 10 व्या मिनिटाला माझा राजीनामा देतो म्हणत त्यांनी आपला राजीनामा सादर केल्यानं पालिकेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

औरंगाबाद महापालिकेवर काय होऊ शकतो परिणाम

औरंगाबाद पालिकेच्या निवडणूका अवघ्या 5 महिन्यांवर आल्या असताना भाजपच्या उपमहापौरांनी आपला राजीनामा सादर केला आहे. भाजपने पालिकेतील युती तोडली तर शिवसेनेसमोर अडचणी निर्माण होण्याची चिन्हं आहेत. सध्या पालिकेत शिवसेना-भाजप आणि त्यांना अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा असं समीकरण असल्यानं ते कोलमडू शकतं. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं समीकरणं स्थानिक पातळीवरही होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठऱणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 13, 2019, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading