महावितरणच्या अभियंता आणि ग्राहकामध्ये फ्री-स्टाईल मारामारी

महावितरणच्या अभियंता आणि ग्राहकामध्ये फ्री-स्टाईल मारामारी

पिसादेवी येथील प्रवीण पालवे यांनी रस्त्यातील पोल हटवण्यासाठी महावितरणकडे लेखी तक्रार केली. मात्र वारंवार विनंती करूनही काम होत नव्हते.

  • Share this:

08 फेब्रुवारी : औरंगाबाद येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ग्राहक आणि सहाय्यक अभियंता यांच्यात फ्री-स्टाईल मारामारी झाली.

पिसादेवी येथील प्रवीण पालवे यांनी रस्त्यातील पोल हटवण्यासाठी महावितरणकडे लेखी तक्रार केली. मात्र वारंवार विनंती करूनही काम होत नव्हते. काल बुधवारी प्रवीण पालवे यांनी सहाय्यक अभियंता सचिन लालसर यांच्यात याच कामावरून बाचाबाची झाली आणि दोघांनीही एकमेकांना खाली पाडून मारहाण केली. या दोघात मारहाण होत असताना महावितरण आणि पालवे यांचे मित्र ही एकमेकांना भिडले आणि जवळपास अर्धा तास महावितरणच्या समोर हे मारहाण नाटय रंगलं.

शेवटी काही नागरिकांनी मध्यस्थी करून मारहाण थांबवली. मात्र या घटनेनंतर  कुणीही एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2018 07:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading