...तर महिलांना घेवून रस्त्यावर उतरू, MIM खासदार इम्तियाज जलील यांचा आक्रमक इशारा

...तर महिलांना घेवून रस्त्यावर उतरू, MIM खासदार इम्तियाज जलील यांचा आक्रमक इशारा

सरकारच्या निर्णयानंतर औरंबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे : मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरानंतर औरंबादमध्येही कोरोनाचा प्रादुर्भा वाढू लागला आहे. रेड झोन झालेल्या औरंबादेत आतापर्यंत एकूण 291 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनामुळे 10 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. एकीकडे ही स्थिती असताना अर्थव्यवस्था पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य सरकारकडून हॉटस्पॉट नसलेल्या भागात मद्यविक्रीचा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर औरंबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'रेड झोनमध्येही दारूची दुकाने उघडण्याचा सरकारचा निर्णय! औरंगाबादमधील दारूचे दुकाने उघडल्यास आम्ही सर्व लॉकडाऊनचे निर्बंध तोडू आणि सक्तीने ही दुकाने बंद करू. महिलांना घेवून रस्त्यावर उतरू. दारू विक्री करण्याची आणि माता-भगिनींसाठी समस्या निर्माण करण्याची ही वेळ नाही,' असं ट्वीट करत इम्तियाज जलील यांनी इशारा दिला आहे.

प्रशासनाने काय भूमिका घेतली?

औरंगाबादमधील कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेत प्रशासनाने शहरात मद्यविक्री करण्यास मनाई केली आहे. औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये असल्याने प्रशासन जोखीम घेण्यास तयार नाही. त्यामुळे औरंगाबादेत मद्यप्रेमींना अजून काही दिवस कळ सोसावी लागणार, असंच चित्र आहे.

सरकारने काय निर्णय घेतला होता?

राज्य सरकारने लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल केले आहेत. रेड झोनमध्ये अत्यावश्यक दुकानाशिवाय इतर दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, पुण्यात वाईन शाॅप सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, सोशल डिस्टन्स नियम आणि पाच लोकांपेक्षा जास्त दुकानात नसतील, याची खबरदारी घेतली जाईल. तसेच स्थानिक पोलिस लक्ष देतील, अशी निर्बंध घालण्यात आली आहेत. रेस्टॉरंट, बार मात्र बंद राहतील. रेडझोनमध्ये जीवनावश्यक गोष्टी वगळता कशालाही परवानगी नव्हती. यात आता सरकारने शिथिलता आणली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 4, 2020, 10:13 AM IST

ताज्या बातम्या