Home /News /maharashtra /

''जरुरी है मेरा देश जलता रहे !'', शेर ऐकवत इम्तियाज जलील यांची राज ठाकरेंच्या सभेवर प्रतिक्रिया

''जरुरी है मेरा देश जलता रहे !'', शेर ऐकवत इम्तियाज जलील यांची राज ठाकरेंच्या सभेवर प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. जलील यांनी आपल्या प्रतिक्रियेत दोन शेर ऐकवले आहेत.

    औरंगाबाद, 02 मे: औरंगाबादचे (Aurangabad) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज ठाकरे यांच्या सभेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. जलील यांनी आपल्या प्रतिक्रियेत दोन शेर ऐकवले आहेत. सियासत के दुकानों में रोशनी के लिए जरुरी है मेरा देश जलता रहे, असा शेर यावेळी त्यांनी ऐकवला आहे. ते म्हणतात इशारा, तर आता पोलिसांनी अर्थ सांगावा, नाही सांगितलं तर जीभ आम्हाला ही आहे, तुमच्यापेक्षा चांगल्या भाषेत आम्ही उत्तर देऊ शकत. पण यांचा दंगल करायचा हा डाव आहे, अशी टीका ही त्यांनी केली आहे. इम्तियाज जलील यांचा पहिला शेर सियासत नफरतों के जख्म को भरने ही नही.. हा शेर ऐकवून जलील यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचं विश्लेषण केलं आहे. सियासत नफरतों के जख्म को भरने ही नही देती..जब भी भरने आता है जख्म,वहा मख्खी बैठ जाती है!, असा पहिला शेर त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना ऐकवला. दुसरा शेर सियासत की दुकानों में रोशनी के लिये जरूरी है मुल्क मेरा जलता रहे... असा दुसरा इम्तियाज जलील यांनी ऐकवला. काय म्हणाले इम्तियाज जलील ते म्हणतात इशारा, तर आता पोलिसांनी अर्थ सांगावा, नाही सांगितलं तर जीभ आम्हाला ही आहे, तुमच्यापेक्षा चांगल्या भाषेत आम्ही उत्तर देऊ. दंगल करायचा हा डाव आहे. मात्र याला अंत नाही. भोंगे काढायला आमचा विरोध नाही आम्ही कधीही विरोध केला नाही. या सभेत नियमांचे उल्लंघन झालंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे नाही केले तर मी कोर्टात जाणार, असा इशाराही जलील यांनी दिला. उन्हाळ्यात नारळ मलईचा स्कीनसाठी होतो जबरदस्त फायदा; अशा प्रकारे घरच्या-घरी फेसपॅक बनवून बघा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा इशारा हा मुस्लिम जनतेला नाही, राज्याला आहे. आम्हाला पाहायचं आहे आणि आता हे कसे निर्णय घेतात खास करून राष्ट्रवादीचे लोक काय निर्णय घेतात हे पाहण्यास ठरणार आहे, असंही जलील म्हणाले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: MNS, Raj Thackeray (Politician)

    पुढील बातम्या