• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • औरंगाबाद लोकसभा निवडणूक : चंद्रकांत खैरेंची प्रतिष्ठा पणाला

औरंगाबाद लोकसभा निवडणूक : चंद्रकांत खैरेंची प्रतिष्ठा पणाला

औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे सलग चार वेळा खासदार झाले. यावेळी मात्र काँग्रेसचे सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

 • Share this:
  औरंगाबाद, 16 मे : औरंगाबादची लोकसभेची जागा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे सलग चार वेळा खासदार झाले आहेत.यावेळी मात्र काँग्रेसचे सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळेच औरंगाबादमध्ये यावेळी तिरंगी लढत आहे. मागच्या निवडणुकीत खैरेंचा विजय 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश पाटील यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे यांना 5 लाख 20 हजार 902 मतं मिळाली तर सुरेश पाटील यांना 3 लाख 58 हजार 902 मतं होती. अनेक वर्षं सेनेचं वर्चस्व 1998 ची लोकसभा निवडणूक सोडली तर शिवसेना इथे 1989 पासून 2014 पर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व राखून आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप शिवसेना युतीने काँग्रेसवर जोरदार मात केली. आताही शिवसेना - भाजपची युती असली तरी मतदार सेनेला कौल देतात का हे पाहावं लागेल. औरंगाबादमध्ये MIM फॅक्टर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांत मराठा समुदायाचं वर्चस्व आहे. कन्नड, औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा ताबा आहे. औरंगाबाद विधानसभेची जागा मजलिस - ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM चा ताबा आहे. औरंगाबाद पूर्व आणि गंगापूरमध्ये भाजपचं वर्चस्व आहे.वैजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा कब्जा आहे. औरंगाबादमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. या मतदानात मतदारांनी कुणाला कौल दिला हे 23 मे ला च कळू शकेल. ================================================================================= VIDEO : कोलकात्यात अखेरच्या सभेत मोदींचा ममतादीदींना थेट इशारा
  First published: