विधानसभेपूर्वी काँग्रेसला औरंगाबादमध्ये मोठा झटका, शिवसेनेचा विक्रमी मतांनी विजय

विधानसभेपूर्वी काँग्रेसला औरंगाबादमध्ये मोठा झटका, शिवसेनेचा विक्रमी मतांनी विजय

औरंगाबादमधील विधानपरिषदेच्या या जागेवर शिवसेनेचा विजय आधीपासून पक्का मानला जात होता.

  • Share this:

औरंगाबाद, 22 ऑगस्ट : औरंगाबादमधील विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे विक्रम मतांनी विजय मिळवत काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी यांचा पराभव केला आहे. अंबादास दानवे यांनी 547 मतांपैकी 523 मते मिळवत काँग्रेसचा धुव्वा उडवला.

औरंगाबादमधील विधानपरिषदेच्या या जागेवर शिवसेनेचा विजय आधीपासून पक्का मानला जात होता. त्यातच काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनीही शिवसेनेच्या अंबादास दानवे यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या विजयाच्या आशा मावळल्या. परिणामी या जागेचा निकाल एकतर्फी असाच लागला.

या विधानपरिषद निवडणुकीत 98.50 टक्के मतदान झालं. 10 मतदार मतदानाला गैरहजर राहिले. अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या 110 मतदानाच्या पाठिंब्या मुळे माझा विजय पक्का असल्याचं युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी निकालाआधीच म्हटलं होतं.

लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या पराभवामुळे सेनेचं औरंगाबादमध्ये खच्चीकरण झालं होतं. त्यामुळे खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये लक्ष घातलं होतं.  शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी युतीच्या सर्व मतदारांना तंबी दिली होती. तसंच गद्दारी केल्यास सोडणार नाही, असा इशाराही दिला होता.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणाचं किती संख्याबळ?

विधानपरिषद निवडणुकीत एकूण 556 मतांपैकी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या अंबादास दानवे यांच्याकडे युतीचे 336 मतदान होते. त्यामुळेच काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी यांच्यासाठी ही लढत फारच कठीण मानली जात होती. अशातच सत्तार यांनीही शिवसेनेलाच पाठिंबा दिल्याने अंबादास दानवे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.

VIDEO : कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर राज ठाकरे झाले भावूक, केलं हे आवाहन

Published by: Akshay Shitole
First published: August 22, 2019, 9:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading