संतापजनक! कोरोनाच्या कंटेन्मेंट झोनमध्ये मोठी गर्दी, फटाके फोडून रुग्णाचं केलं स्वागत

संतापजनक! कोरोनाच्या कंटेन्मेंट झोनमध्ये मोठी गर्दी, फटाके फोडून रुग्णाचं केलं स्वागत

सदरील रुग्ण वैजापूर नगरपालिकेचा माजी उपनगराध्यक्ष आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 6 जुलै : कोरोनाचं थैमान वाढत असताना अनेकजण बेजाबदार कृत्य करत कोरोनाला निमंत्रण देत असल्याचं दिसत आहे. यामध्ये स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारेही मागे नाहीत. औरंगाबादमध्ये कोरोनामुक्त झाल्यानंतर माजी नगराध्यक्षाने कोरोनाच्या कंटेन्मेंट झोनमध्येच मोठी गर्दी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरात एक कोरोना रुग्ण बरा होऊन आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सदरील रुग्ण वैजापूर नगरपालिकेचा माजी उपनगराध्यक्ष आहे. त्याच्या स्वागतासाठी फटाके फोडण्यात आले. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केल्याने सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडालेला होता.

शंभर मीटरच्या परिघात जवळजवळ 70 कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या कोरोनाच्या कंटेन्मेंट झोनमध्ये शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून गर्दी करण्यात आली. वैजापुरात स्थानिक जनता कर्फ्यू असतानाही असं दृश्य पाहायला मिळालं. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वैजापुरात मोठी रॅली काढणाऱ्या माजी उपनगराध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात एकूण 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मोठ्या प्रमाणात लोक जमवून फटाके फोडून जमावबंदी मोडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, 150 रुग्णांची भर

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 150 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 49 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 85 पुरूष तर 65 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण 6880 कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी 3374 रुग्ण बरे झालेले असून 310 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 3196 जणांवर उपचार सुरू  आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 934 स्वॅबपैकी आज 150 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवलं आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण –(101)

घाटी परिसर (1), जाधव मंडी (3), अरिष कॉलनी (3), सिडको एन-11 (3), दिल्ली गेट (1), गजानन नगर (4), पुंडलिक नगर (1), छावणी (2), किराणा चावडी (1), एन 11 हडको, (1), आदर्श कॉलनी गारखेडा (1), नाईक नगर (4), उस्मानपुरा (5), उल्कानगरी (2),शिवशंकर कॉलनी (8), एमआयडीसी, चिखलठाणा (1), मातोश्री नगर (2), नवजीवन कॉलनी (1), श्रध्दा कॉलनी (1),  एन-6 (1), एन-2 सिडको, ठाकरे नगर (1), जटवाडा रोड (1), पोलिस कॉलनी (2), दशमेश नगर (7), वेदांत नगर (1), टिळक नगर (1), एन-9 सिडको (1), प्रगती कॉलनी (1), देवळाई, सातारा परिसर (2),जयभवानी नगर (3), अंबिका नगर (1), गजानन कॉलनी (3), पद्मपुरा (15), सिंधी कॉलनी (1),पडेगाव (2), सिल्क मिल कॉलनी (4), रेल्वे स्टेशन परिसर (4), टिव्ही सेंटर (4), अन्य (1),  

 ग्रामीण भागातील रुग्ण- (49)

विहामांडवा (1), सिध्देश्वर नगर, सुरेवाडी (1), कारंजा (1), वाळुज (1), हिरापुर सुंदरवाडी (3), स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर (2), सावरकर कॉलनी, बजाज नगर (2),  वडगांव बजाज नगर (2), निलकमल सोसायटी, बजाज नगर (4), साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर (5), साऊथ सिटी, बजाज नगर (1), दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी (1), सायली सोसायटी बजाज नगर (3), शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी (2),  जिजामाता सोसा.बजाज नगर (3),  पंचगंगा सोसा. बजाजनगर (1), विश्व विजय सो. बजाजनगर (2), डेमनी वाहेगांव (3), पैठण (3), इंदिरा नगर, वैजापुर (5), अजिंठा (2), शिवणा (1), या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: July 6, 2020, 10:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading