औरंगाबादमध्ये तरुणाने खवड्या कड्यावरुन मारली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा Live Video

ही दृश्य ह्रदयाचा ठोका चुकविणारी आहेत

ही दृश्य ह्रदयाचा ठोका चुकविणारी आहेत

  • Share this:
    औरंगाबाद, 6 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून आपण आत्महत्येच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मात्र औरंगाबादमधील हा व्हिडीओ तुमच्या काळजाचा ठोका चुकविणारा आहे. खवड्या डोंगरावर पुन्हा आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाईट म्हणजे हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी या डोंगरावर आत्महत्येची घटना समोर आली होती. त्यानंतर आज आणखी एक आत्महत्येची घटना समोर आली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. हा तरुण डोंगराच्या कोपऱ्यावर बराच काळ उभा होता. तर दुसरीकडे रस्त्याच्या दिशेने काही जण मोबाइलमधून व्हिडीओ शूट करीत होते. काही सेकंदाच्या अंतराने अचानक तरुणाने डोंगरावरुन उडी घेतली. त्याचा व्हिडीओ समोर आल्याने मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलिसांकडून त्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. या तरुणाने आत्महत्या का केली, यावेळी त्याच्यासोबत कोणी होतं का याचाही तपास घेतला जाणार आहे. मात्र अशा प्रकारे हा व्हिडीओ दुर्देवी आहे. यानंतर पुन्हा एकदा या तरुणाला वाचविण्यासाठी कोणीच पुढं आलं नसल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाऊनदरम्यान आर्थिक चणचणीतून अनेकांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. याशिवाय नैराश्यातूनही आत्महत्येचं पाऊल उचलल्याचे गेल्या काही दिवसांत समोर आलं आहे. सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर अनेक आत्महत्याच्या घटना समोर आल्या आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published: