• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • देशभरात औरंगाबादमध्ये सर्वात महाग पेट्रोल !

देशभरात औरंगाबादमध्ये सर्वात महाग पेट्रोल !

आज औरंगाबादेत पेट्रोल 81 रूपये 23 पैसे दर लिटरचा दर आहे. हा देशातील सर्वोच्च दर आहे.

  • Share this:
24 जानेवारी : देशभरात पेट्रोलच्या दराचा भडका उडालाय. राज्यातही पेट्रोलच्या दराने 80 चा आकडा पार केलाय. आज मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये पेट्रोलचे दर 81 रुपये 23 पैसे इतका असून हा देशातील सर्वोच्च दर आहे. औरंगाबादेतील पेट्रोलच्या दरानं देशात पहिला क्रमांक मिळवलाय. आज औरंगाबादेत पेट्रोल 81 रूपये 23 पैसे दर लिटरचा दर आहे. हा देशातील सर्वोच्च दर आहे. गेल्या आठ महिन्यात औरंगाबादचा पेट्रोलदर 72 रूपयांवरून 82 रूपयांपर्यंत वाढला आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यभरात पेट्रोलने ऐंशी गाठली होती. परभणीत तब्बल 81.68 रुपये दराने पेट्रोलची विक्री झाली होती. त्यापाठोपाठ नांदेड 81.51 तर अमरावतीमध्ये 81.11 रुपये दर गगनाला भिडले होते. औरंगाबादमध्ये पेट्रोल महाग का ? औरंगाबादेत शहराच्या सौदर्यीकरणासाठी तीन टक्के आगाऊ कर असल्यामुळs पेट्रोलच्या किंमती इतरांपेक्षा जास्त असल्याचा दावा पेट्रोल पंप चालक मालक संघटनेनं केला आहे. मात्र ग्राहकांनीही वाढत्या पेट्रोल दराबाबत नाराजी व्यक्त केलीय. देशातील चार महानगरांचे पेट्रोल दर औरंगाबाद  81.23 मुंबई          80.08 चेन्नई        75.07 कोलकाता  75.07 दिल्ली       72.26
First published: