सोशल मीडियातून अनिष्ट प्रथांवर टीका करणं गुन्हा नाही -औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

आपल्याच धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा, पंरपरा आणि अंधश्रद्धांवर सोशल मीडियातून टीका करणं हा गुन्हा नाही असा महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2018 04:03 PM IST

सोशल मीडियातून अनिष्ट प्रथांवर टीका करणं गुन्हा नाही -औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

औरंगाबाद, ता.18 सप्टेंबर : आपल्याच धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा, पंरपरा आणि अंधश्रद्धांवर सोशल मीडियातून टीका करणं हा गुन्हा नाही असा महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर भगवान परशुराम आणि सैराट चित्रपटातला हिरो 'परश्या' म्हणजे आकाश ठोसर यांचे फोटो एकत्र करून तुम्हाला कुठला परशा आवडतो अशी पोस्ट करण्यात आली होती. या प्रकरणी पाच तरूणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. या निकालामुळे या पाचही तरूणांविरूद्धचे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत.

परशुराम जयंतीच्या दिवशी भगवान परशुराम यांच्याविषयी केलेल्या पोस्ट मुळं भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी अशोक देशमुख, रवी सावंत, गजानन हेंडगे, कुंडलिक देशमुख आणि सुभाष जावडे या तरूणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. याविरूद्ध हे तरूण कोर्टात गेले होते.

न्यायमूर्ती तानाजी नलावडे आणि विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. आपल्याच धर्मातील अनिष्ट रूढी परंपराविरूद्ध टीका करणं म्हणजे भावना दुखावणं नाही. पुराणातील काही संदर्भ देत ही पोस्ट करण्यात आली होती. भावना दुखावणं हा त्याचा उद्देश नव्हता असा युक्तीवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला होता. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत या तरूणांविरूद्धचे गुन्हे रद्द करण्याचा आदेश दिला.

VIDEO: 'अल्याड शंकर धुणे धुतो, पल्याड गौराई न्याल ग'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...