Aurangabad Graduate Election 2020 : कोण मारणार बाजी, राष्ट्रवादी साधणार का हॅटट्रिक?

Aurangabad Graduate Election 2020 : कोण मारणार बाजी, राष्ट्रवादी साधणार का हॅटट्रिक?

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 35 उमेदवार आहेत. मात्र, प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून भाजप आणि महाविकास आघाडीतच हा सामना रंगणार आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 03 डिसेंबर : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच स्थानिक निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यामुळे यंदाच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत (Aurangabad Graduate Election 2020) भाजप (BJP) विरुद्ध महाविकास आघाडी (maha vikas aghadi government) असा सामना पाहण्यास मिळाला. औरंगाबाद पदवीधर संघात यंदा विक्रमी 61.08 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण पुन्हा हॅटट्रिक साधता की भाजप बाजी मारणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

शबरीमला, वैष्णोदेवीचा प्रसाद घरपोच मिळणार; पोस्ट खात्याची विशेष सुविधा

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 35 उमेदवार आहेत. मात्र, प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून भाजप आणि महाविकास आघाडीतच हा सामना रंगणार आहेत. त्यातून राष्ट्रवादी औरंगाबाद राखणार की भाजप सुरुंग लावणार याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. यंदाची पदवीधर निवडणूक आक्रमक प्रचारामुळे गाजली. यावेळी सर्वंच पक्षांनी प्रचारात पुरता जोर लावला आहे.

मराठवाडा विभाग पदवीधरची आमदारकी गेली दोन टर्म ही राष्ट्रवादीच्या सतिश चव्हाण यांच्याकडे आहे. तिसऱ्या टर्मसाठी त्यांनी जोरदार तयारी केली, अगदी राष्ट्रवादीचे सगळेच दिग्गज प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले होते,  त्यात राज्यात तीन पक्षांची सरकार असल्यानं प्रचारात शिवसेना आणि काँग्रेसचीही साथ महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली आणि त्यातून भाजपचा पाडाव करण्यासाठी सगळेच एकवटले.

'मला बायकोमध्ये आता रस वाटत नाही, Extra Marital Affair साठी मन खुणावतं'

दुसरीकडे भाजपनंही या निवडणुकीत पुरता जोर लावला आहे, खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं चित्र आहे. पुरत्या मराठवाड्यात भाजपनं प्रचाराची राळ उठवली. गेली दोन टर्मही जागा राष्ट्रवादीकडे असली तरी या आधी या जागेवर भाजप जिंकायचे त्यामुळे दोन्ही पक्ष या निवडणुकीत झपाट्यानं कामाला लागलेले पहायला मिळाले. आता भाजप त्यांची परंपरागत जागा परत मिळवतं, की राष्ट्रवादी विजयाची हॅटट्रिक गाठणार, पदवीधर मतदार राजा नक्की कुणाला कौल देणार याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Published by: sachin Salve
First published: December 3, 2020, 7:57 AM IST
Tags:

ताज्या बातम्या