औरंगाबाद, 3 डिसेंबर: औरंगाबाद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीला सुरू असून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसन जोरदार मुसंडी मारली आहे. धुळ्यात भाजपनं विजय मिळवला असला तरी मात्र औरंगाबाद मतदारसंघात भाजप पिछाडीवर दिसत आहे.
पहिली फेरीत राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 27879 मत मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना 10973 मत मिळाली आहेत. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना 17906 मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, पहिल्या फेरीत 56 हजार मतं मोजण्यात आली.
हेही वाचा... पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल येण्यास लागणार 40 तास!
तसं पाहिलं तर औरंगाबाद पदवीधर मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे यंदा विजयाची हॅटट्रिक करणार असा दावा सतीश चव्हाण यांनी केला आहे. सतीश चव्हाण यांनी दोन टर्म आपण चांगलं काम केल्यामुळे मतदार आपल्यालाच निवडून देतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरिष बोराळकर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काट्याची लढत होईल, असं चित्र दिसत आहे.
या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरिष बोराळकर आहेत. सतीश चव्हाण हे सलग दोन वेळा औरंगाबाद पदवीधरच्या जागेवर निवडून आले आहे. गेल्यावेळी चव्हाण यांच्याविरोधात बोराळकरच उभे होते. मात्र तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यंदा ही निवडणूक चुरशीची होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, भाजपनं यंदा विजयासाठी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचं पारडं जड मानलं जात आहे. त्यांच्या गाठीशी दोन निवडणुकांचा अनुभव आहे. त्यामुळे औरंगाबाद पदवीधर मधून यंदा कोण बाजी मारणार हे निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा...संकटांच्या मालिकांना तोंड देणारं सरकार संबोधून पवारांकडून मुख्यमंत्र्यांच कौतुक
विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मराठवाड्यातील काही बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांकडे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम यंदाच्या पदवीधर निवडणुकीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.