• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • ॲसिडिटीसाठी दिल्या जाणाऱ्या इंजेक्‍शनमध्ये आढळली चक्क बुरशी!

ॲसिडिटीसाठी दिल्या जाणाऱ्या इंजेक्‍शनमध्ये आढळली चक्क बुरशी!

औरंगाबादेतल्या घाटी रुग्णालायातला ॲसिडिटीसाठी दिल्या जाणाऱ्या 'रॅनिटिडीन' इंजेक्‍शनमध्ये चक्क बुरशी आढळली असून, या प्रकारामुळे रुग्णलाय प्रशासन खडबडून जागं झालंय.

 • Share this:
  औरंगाबाद, 26 नोव्हेंबर : ढिसाळ कारभाससाठी आधीच प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादेतल्या घाटी रुग्णालायातला आणखी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ॲसिडिटीसाठी अर्थात आम्लपित्तासाठी दिल्या जाणाऱ्या इंजेक्‍शनमध्ये चक्क बुरशी आढळली आहे. सुदैवानं या इंजेक्शनचा वापर एकाही रुग्णावर करण्यात आला नसल्याने पुढील अनर्थ टळला. गेल्या वर्ष भरापासून रूग्णालयात औषधांचा साठाच नव्हता. काही दिवसांपूर्वी आलेल्या औषधी साठ्यात ही निकृष्ट दर्जाची औषधं आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादचं घाटी रुग्णालय हे पूर्वीपासूनच तेथे चालणार्या भोगळ कारभारामुळे प्रसिद्ध आहे. शहरात अनेक खासगी रुग्णालये असली तरी औरंगाबाद आणि जिल्ह्याती गोरगरिब रुग्ण उपचासासाठी घाटीकडेच धाव घेतात. रुग्णालायात रुग्णांसाठी विविध सेवा सुविधा असल्या तरी त्या केवळ नावापुरत्याच आहेत. सर्व सोयींमुळे हे रुग्णलाय प्रशस्त असलं तरी, येथील ढिसाळ कारभारामुळे त्या सर्व सुविधांचा लाभ अनेक गरजु रुग्णांना घेताच येत नाही. प्रशासनाचा भोंगळ कारभार त्यास करणीभूत असल्याचं नेहमी म्हटलं जातं. त्याचच उदाहरण परत एकदा सोमवारी घाटीमध्ये पहायला मिळालं. रुग्णालयात ॲसिडिटीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'रॅनिटिडीन' नावाच्या इंजेक्‍शनमध्ये चक्क बुरशी आढळून आली. ही बाब उघडीस येताच रुग्णाल प्रशासन खडबडून जागं झालं. औषध सदोष असल्याचं लक्षात येताच तो साठा वेगळा करण्यात आला. सुदैवानं या इंजेक्शनचा वापर एकाही रुग्णावर करण्यात आला नव्हता, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. औषधांची निर्मिती करणाऱ्या 'हफकीन' या मेडिसीन कंपनीमार्फत घाटीला औषध पुरवठा केला जोतो. 'रॅनिटिडीन' इंजेक्‍शनचा पुरवठासुद्धा याच कंपनीने घाटीला रुग्णालयाला केला होता. या प्रकारानंतर खडबडून जाग्या झालेल्या रुग्णालय प्रशासनामार्फत राज्य सरकरला अहवाल आणि 'हफकीन' कंपनीला नोटीस पाठविण्यात येणार असल्याचं घाटीचे प्रशासकीय अधिकारी डॉ. जिने यांनी सांगितलं. ढिसाळ कारभारामुळे आधीच घाटी रुग्णालय बदनाम झालं आहे. गेल्या वर्षभरापासून रुग्णालयात औषधांचा साठाच नव्हता अशी धक्कादायक माहिती या प्रकारामुळे समोर आली आहे. त्यात आता औषधं उपलब्ध झाली असताना, अॅसिडिडीसाठी दिल्या जाणाऱ्या 'रॅनिटिडीन' इंजेक्‍शनसाठ्यात बुरशी आढळल्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर आणखी एक प्रश्नचिन्ह लागलं आहे. तर, घाटी प्रशासकडून कायम अश्या पध्दतीच्या चुका होत असल्याचा आरोप घाटीमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. गेल्या वर्ष भरापासून घाटी रूग्णालयात औषधींचा साठा नव्हता. काही दिवसांपूर्वी आलेला हा औषधी साठा खराब झालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तपासात सदोष आढळल्याने त्याचा सर्व साठा त्वरीत बाजूला काढण्यात आला. बुरशी आढळेलं इंजेक्शन सुदैवाची कुणलाच दिलं गेलं नव्हतं, अन्यथा अनेक रूग्णांच्या जीवितालाच धोका निर्माण झाला असता हे मात्र निश्चित.  #Mumbai26/11 : कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या देविकाला भेटायचंय मोदींना!
  First published: